Amit Deshmukh News : जालन्यात ठाकरे यांच्या अनुपस्थितीत अमित देशमुखांनी लढवला किल्ला..!

Jalna Loksabha Constituency : सत्ताधाऱ्यांनी दिलेले कुठलेही आश्वासन मागच्या दहा वर्षात पूर्ण केलेले नाही. महागाई बेरोजगारी वाढवून फसवणूक केल्यामुळे सत्ताधाऱ्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड राग आणि चीड आहे. त्यामुळे आता जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे
Amit Deshmukh
Amit Deshmukh Sarkarnama

Jalna News : महाविकास आघाडीचे लोकसभा जालना मतदारसंघाचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जालन्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याची सभा आयोजित करण्यात आली होती. संध्याकाळी अचानक जालना जिल्ह्याच्या काही भागात गारपीठ आणि अवकाळी पाऊस झाला आणि खराब वातावरणामुळे उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द झाला.

सभेची जय्यत तयारी महाविकास आघाडीने केली होती. माजी मंत्री आमदार अमित देशमुख, काँग्रसचे (Congress) विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार व आघाडीचे सर्व प्रमुख नेते सभेसाठी आवर्जून उपस्थित होते. काँग्रेसच्या नेत्यांनी भाषणे करत महायुती व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरेंच्या अनुपस्थितीत अमित देशमुख यांनी कल्याण काळे यांच्यासाठी किल्ला लढवल्याचे दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Deshmukh
Beed Loksabha News : भुजबळांवर टीका करत जरांगे पाटलांनी काढलं प्रीतम मुंडे यांचे सासर...

राज्य आणि केंद्रातील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दिलेले कुठलेही आश्वासन मागच्या दहा वर्षात पूर्ण केलेले नाही. महागाई बेरोजगारी वाढवून फसवणूक केल्यामुळे सत्ताधाऱ्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड राग आणि चीड आहे. त्यामुळे आता जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फक्त जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे, असे आवाहन अमित देशमुख यांनी यावेळी केले.

विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांनीही भाजपच्या (BJP) फोडाफोडीच्या राजकारणावर कडाडून हल्ला चढवला. ठाकरे सभेला न आल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला, पण संभाजीनगर येथील सभेत त्यांनी काळे यांच्यासाठी आवाहन करत भाजपवर टीका केली.जालना येथील सभा संपल्यानंतर कल्याण काळे तातडीने संभाजीनगरात दाखल झाले. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले.भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी खैरे आणि काळे यांचे हातात हात घेऊन उपस्थित गर्दीला अभिवादन केले.

Amit Deshmukh
Ajit Pawar News : "हा पठ्ठ्या खासदारकीला पडला, मुलीला ग्रामपंचायतीत निवडून आणता आलं नाही, पैशांची मस्ती आलीय"

दरम्यान, जालन्याची सभा अमित देशमुख यांनी गाजवली. लातूरसह मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली होती. पहिल्या टप्यात नांदेड,परभणी, हिंगोली, दुसऱ्या टप्प्यात होमपिच लातूर आणि धाराशिवमध्ये अमित देशमुख यांनी एकहाती किल्ला लढवला. आता मराठवाड्यातील शेवटच्या टप्प्यात जालना, संभाजीनगरमध्ये अमित देशमुख आपल्या प्रभावी भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.जालन्यातील महाविकास आघाडीच्या सभेला माजी मंत्री राजेश टोपे, खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited by : Chaitanya Machale)

Amit Deshmukh
Jayant Patil News : आता जयंत पाटलांनीही अजितदादांविरोधात तलवार उपसली; म्हणाले, ' त्यांना दम देण्याची पूर्वीपासूनच सवय....'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com