Ajit Pawar News : "हा पठ्ठ्या खासदारकीला पडला, मुलीला ग्रामपंचायतीत निवडून आणता आलं नाही, पैशांची मस्ती आलीय"

Ajit Pawar On Pankaja Munde : "पंकजाताई निवडून आल्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात घ्या, अशी शिफारस मी करणार"
bajrang sonwane ajit pawar
bajrang sonwane ajit pawarsarkarnama

Beed News, 11 May : काही लोकांना दोन पैसे आल्यावर मस्ती येते. तशी मस्ती बजरंग सोनवणे याला आली आहे. एवढे दिवस माझ्यासोबत पक्षात राहिला. मी एवढं सगळं देऊन सुद्धा मला सोडून गेला. जो मला सोडू शकतो, तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजरंग सोनवणे यांना लक्ष्य केलं आहे.

पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये सभा पार पडली. याला छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ), मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ), रासपचे नेते महादेव जानकर ( Mahadev Jankar ), भाजपचे नेते सुरेश धस ( Suresh Dhas ) आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्याशी माझी जवळीकता वाढली आहे. त्यामुळे पंकजाताई निवडून आल्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात घ्या, अशी शिफारस मी करणार आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले, "बजरंग त्यांच्या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी सतत माझ्याकडे येत होता. मी परवानगी देत नव्हतो. पण, या शहाण्यानं ( धनंजय मुंडे ) परवानगी द्यायला लावली. मी धनंजयला सांगितलं होतं, वेसन घालून काही गोष्टी हातात ठेवल्या पाहिजे. मी 35 वर्षापासून राजकारण करतोय. मला माहिती होतं, बजरंग कुठेतरी उडी मारणार आहे."

"धनंजय मला म्हणायचा, 'पुणे जिल्हा किंवा शिखर बँकेतून बजरंग सोनवणेला कर्ज मिळवून द्या.'मात्र, कधी कधी धनुभाऊला माणसंच कळत नाहीत. त्यामुळे गाडी बिघडते. प्रत्येकवेळी माझा सल्ला घेत जा... बजरंग सांगायचा छाती फाडली की हे दिसेल ते दिसेल... मात्र, छाती फाडली की मरून जाशील... उग काहीही गप्पा हाणायच्या... हनुमानानं फाडलेली वेगळी. तू बजरंग आहे, म्हणून स्वत:ला हनुमान समजायला लागला का?" असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

bajrang sonwane ajit pawar
Ajit Pawar : अजितदादांचा दोन दिवसांत दोन नेत्यांना दम; ऐन पावसात महाराष्ट्राचं राजकारण तापलं

"बार्शी आणि बीडमध्ये बजरंगचे कारखाने चालू आहे. चांगलं चाललं होतं. काय औदसा आठवली काय माहिती... आता निवडणुकीला एकदम उभे राहिला आहे. मागे एकदा निवडणुकीला पडला होता. आता कशाला उभे राहायचं... व्यवसाय, प्रपंच निट केला पाहिजे. पण, काही-काही लोकांना दोन पैसे आल्यावर मस्ती येते. तशी मस्ती बजरंगला आली आहे. एवढे दिवस माझ्यासोबत पक्षात राहिला. मी एवढं सगळं देऊन सुद्धा मला सोडून गेला. जो मला सोडू शकतो, तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार? हा पठ्ठ्या स्वत: खासदारकीला पडला. मुलीला ग्रामपंचायत आणि नगरपालिकेला निवडून आणता आलं नाही. आता खासदार व्हायला निघालाय," अशा शब्दांत अजित पवारांनी बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला आहे.

bajrang sonwane ajit pawar
Ajit Pawar : अजितदादांचा दोन दिवसांत दोन नेत्यांना दम; ऐन पावसात महाराष्ट्राचं राजकारण तापलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com