Latur Assembly Constituency: महाविकास आघाडीला लोकसभेपेक्षा अधिक यश मिळणार!

MVA to Surpass Lok Sabha Success in Upcoming Elections: महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठवाड्यातील औद्योगिकरणाला चालना, शाश्वत पिण्याचे पाणी, विकासाचा अनुशेष, दळणवळणाचा प्रश्न, हवाई वाहतुकीचा प्रश्न रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने जो कौल दिला आहे, त्या पेक्षा अधिक कौल विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे स्टार प्रचारक माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक होणार आहे.

महाविकास आघाडीने कालच लोकसेवेची पंचसूत्री जाहिर केली आहे. महायुतीच्या काळात समान्यावर अन्याय झाला आहे, याला वाचा फोडणारी ही पंचसूत्री आहे. (Amit Deshmukh) गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात फिरत आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या सभांना जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेचा अधिक कौल राहिल, असे ते म्हणाले.

आरक्षण, महागाई, बेरोजगारी अशा सर्वच विषयात महायुती अपयशी ठरली आहे. महायुती सरकारला राज्यात जाती सलोखा राखता आलेला नाही. कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न आहे. महाविकास आघाडीने मात्र जातीय सलोखा टिकवण्याचे काम सातत्याने केले आहे. या पुढील काळात देखील असे काम केले जाणार आहे. राज्यात विकास कोण करु शकतो हे जनतेला चांगले माहित आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे अमित देशमुख म्हणाले.

Amit Deshmukh
Amit Deshmukh: 'मुझको राणाजी माफ करना' असे भरसभेत अमित देशमुख का म्हणाले ?

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठवाड्यातील औद्योगिकरणाला चालना, शाश्वत पिण्याचे पाणी, विकासाचा अनुशेष, दळणवळणाचा प्रश्न, हवाई वाहतुकीचा प्रश्न रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल. (Latur) लातूर शहर मतदारसंघात विरोधक फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही वृत्तपत्रात तर दररोज चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत. याची काँग्रेसने गंभिर दखल घेतली आहे. याची पुराव्यासह निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे.

माझ्यावर व्यक्तीगत टिका करुन विरोधक काय साध्य करणार आहेत हे कळत नाही. धोरणावर विकासावर बोलावे. आम्ही काय विकास कामे केली याची एक पुस्तिकाच आम्ही विरोधकांना देवू, असे देशमुख म्हणाले. सोयाबीनला भाव मिळावा म्हणून दिंडी काढणारे आज कोठे गेले. सोयाबीनला भाव नाही. खरेदी केंद्र सुरु होत नाहीत. महागाई वाढली आहे. सर्व उद्योग गुजरातला नेले जात आहेत. येथे बेरोजगारी वाढली आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जनता आता महाविकास आघाडीसोबत आहे, असे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com