Amit Deshmukh : '...म्हणून निलंग्याची निवडणूक स्थगित करायला लावली!'; अमित देशमुखांचा निलंगेकरांवर जोरदार पलटवार

Latur Politics : निलंगा निवडणूक स्थगित केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अमित देशमुख यांनी भाजपवर जनमत विरोधात गेल्याने आयोगावर दबाव टाकल्याचा आरोप करत काँग्रेस पॅनलला एकजूट ठेवण्याचे आवाहन केले.
Amit Deshmukh Criticise Sambahji Patil Nilangekar News
Amit Deshmukh Criticise Sambahji Patil Nilangekar NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur Politics News : निलंगा नगरपालिकेची निवडणूक ऐनवेळी स्थगित केल्यावरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांनी राज्य निवडणुक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर आज निलंगा नगरपरिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांनी बाभळगावला जाऊन अमित देशमुख यांची भेट घेतली. यावेळी जनमत विरोधात जात असल्यानेच सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाला सांगून निलंग्याची निवडणूक स्थगित केल्याचा आरोप करत भाजपाला लक्ष्य केले.

निवडणूक रद्द केल्याबद्दल निलंग्याच्या जनतेमध्ये रोष आहे, तो 20 तारखेला मतपेटीपर्यंत पोहचवण्यासाठी एकजूट कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी भेटीसाठी आलेल्या पॅनलमधील उमेदवार आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केले. निलंगा नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख, पॅनल प्रमुख अजित नाईकवाडे, नगरसेवक पदाचे उमेदवार व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी बुधवारी (ता.2 डिसेंबर) सकाळी बाभळगाव निवासस्थानी जाऊन अमित देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली.

नव्याने प्रचार यंत्रणा राबवण्या संदर्भात यावेळी चर्चा झाली. काही तासावर मतदान आलेला असताना 2 डिसेंबर रोजी होणारी निलंगा नगरपरिषदेची निवडणूक, निवडणूक आयोगाने स्थगित करून ती 20 डिसेंबर रोजी होईल असे जाहीर केले. जनमत विरोधात असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी मंडळींनी निवडणूक आयोगाला सांगून ही निवडणूक स्थगित करायला लावली, अशी धारणा निलंगा जनतेची झाली आहे.

Amit Deshmukh Criticise Sambahji Patil Nilangekar News
Latur Municipal Corporation : लातूर महापालिकेसाठी काँग्रेसची 'मिशन मोड' तयारी; अमित देशमुखांनी टाकला पहिला डाव

त्यामुळे जनतेतून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त होत आहे. या परिस्थितीत जनतेचा हा रोष 20 डिसेंबर रोजी मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा, असे आवाहन अमित देशमुख यांनी उपस्थितांना केले. निलंगा निवडणुकीतील प्रचारात आमदार अमित देशमुख यांनी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर टीका केली होती. निलंग्याचे आमदारांना माझी इतकी आठवण येते की त्यांना सारख्या उचक्या लागतात, मग मला इथे यावचं लागतं, असा टोला अमित देशमुख यांनी लगावला होता.

Amit Deshmukh Criticise Sambahji Patil Nilangekar News
Nilanga Nagar Palika : निवडणुक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले, अमित देशमुखांचा संताप; पण निलंगा बंदमधून काँग्रेसची माघार!

यावर भाजपच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी एका सभेत अमित देशमुख यांच्यावर पलटवार करतांना जे लातूरकरांनाच वेळ देत नाहीत, ते निलंगेकरांचे प्रश्न इथे येऊन काय सोडवणार? असा टोला लगावला होता. निवडणुकी दरम्यान, काँग्रेसला बंडखोरीचाही फटका बसला. भाजपशी हातमिळवणी करून अनेक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचा आरोप करत अकरा जणांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com