Latur Municipal Corporation : लातूर महापालिकेसाठी काँग्रेसची 'मिशन मोड' तयारी; अमित देशमुखांनी टाकला पहिला डाव

Congress mission mode Latur News : काँग्रेसने आता हा गड राखण्यासाठी पक्षाने थेट 'मिशन मोड' मध्ये प्रवेश केला आहे. विशेषतः, राज्याचे माजी मंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कणखर नेतृत्वाखाली ही जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
amit deshmukh
amit deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

​Latur News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच पक्षाने आता वेगाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. लातूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच, काँग्रेस पक्षाने संपूर्ण राजकीय पटलावर खळबळ उडवून देणारी तयारी सुरू केली आहे. एकेकाळी लातूर जिल्ह्याची ओळख ही काँग्रेसचा 'बालेकिल्ला' म्हणून होती. काँग्रेसने आता हा गड राखण्यासाठी पक्षाने थेट 'मिशन मोड' मध्ये प्रवेश केला आहे. विशेषतः, राज्याचे माजी मंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कणखर नेतृत्वाखाली ही जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

amit deshmukh
Bihar Election Result : "फक्त 'एकच' गोष्ट करा, बिहारनंतर नेपाळमध्येही BJP सरकार येईल"; स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरची बोचरी टीका

आगामी काळात होत असलेल्या महापालिका या तयारीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा जाहीर झाला आहे. त्यानुसार आता येत्या काळात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार ​अर्ज स्वीकृती केली जात आहे. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेमुळे केवळ पक्षांतर्गतच नव्हे, तर विरोधी छावणीतही तातडीने हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

amit deshmukh
Rana patil V/s Omraje Nimabalkar : मुंबईच्या आढावा बैठकीतून धाराशिवचे पालकमंत्री, खासदारांचे नाव वगळले! राणा पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम!

लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करणे म्हणजे, काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी फारसा वेळ न घालवता, उमेदवारांची यादी वेळेत निश्चित करून प्रचार यंत्रणा वेगाने कार्यान्वित करायची आहे, असा स्पष्ट संदेश राजकीय वर्तुळात जात आहे.

amit deshmukh
Dharashiv Mahayuti : राणा पाटील-प्रताप सरनाईकांनी जुळवून घेतलं; 6 नगराध्यक्षपदांची भाजप-शिवसेनेत वाटणी; दोनसाठी जोरदार रस्सीखेच

उमेदवारांचा कस लागणार

​निवडणूक तयारीतील ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि पारदर्शक ठेवण्यासाठी काँग्रेसने आठ प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक 'विशेष समिती' गठीत केली आहे. बालाप्रसाद बिदादा, दगडूआप्पा मिटकरी, नामदेव इगे, रफीक सय्यद, प्रा. सिद्राम कटारे, प्रा. प्रवीण कांबळे, संजय निलेगावकर आणि मनोज देशमुख यांचा या समितीत समावेश आहे. सूत्रांनुसार, ही समिती केवळ अर्ज स्वीकारणार नसून, इच्छुकांची पहिली 'चाळणी' म्हणूनही काम करणार आहे. यामुळे केवळ निष्ठावंत आणि तगड्या उमेदवारांनाच संधी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला जात आहे.

amit deshmukh
Vidarbha Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेनं भांडणं टाळली; नगरपालिका अन् नगरपंचायतीच्या निवडणुकांची तीन नेत्यांवर सोपवली जबाबदारी

काँग्रेसचा 'गड' राखण्याची प्रतिष्ठा

​काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा दबदबा पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, त्यांचे प्रत्येक पाऊल टाकले जात आहे. महापालिकेसाठी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सज्ज झाले आहेत, असे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी स्पष्ट केले आहे. या 'मिशन मोड' तयारीमुळे, लातूरच्या राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. येत्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यासाठी विरोधकांना आता नवी आणि अधिक आक्रमक रणनीती आखावी लागणार आहे.

amit deshmukh
Bihar Election Result : "फक्त 'एकच' गोष्ट करा, बिहारनंतर नेपाळमध्येही BJP सरकार येईल"; स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरची बोचरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com