Amit Shah News : 'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी अन् अर्धी काँग्रेस' म्हणत अमित शाहांनी लगावला टोला!

Nanded Lok Sabha Constituency : महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांसाठी नांदेडमध्ये घेतली प्रचारसभा, महाविकास आघाडीवर हल्लाबोल
Amit Shah
Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : 'शरद पवारांसारखा मोठा नेता ज्यांनीे महाराष्ट्रात अनेक वर्ष काम केलं, पण त्यांनाही या राज्याचा विकास करता आला नाही. आता नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी हे दोन अर्धे पक्ष आणि त्यांच्यासोबत जाऊन अर्धी झालेली काँग्रेस राज्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. पण या राज्याचा विकास ही तीन चाकांची रिक्षा करु शकणार नाही. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे.', अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार सभेसाठी अमित शाह नरसी येथे आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी, देशपातळीवरील I.N.D.I.A आघाडीवर टीका करतानाच उद्धव ठाकरे, शरद पवार(Sharad Pawar) यांच्यामुळेच राज्याचा विकास रखडल्याचा आरोप केला. भाषणाच्या सुरुवातीला प्रतापराव पाटील यांना जिंकवण्यासाठी मी नांदेडला आलो आहे, असे सांगतानाच मोदींनी देशाला सुरक्षित, समृद्ध केल्याचा दावा अमित शाह यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah
Imtiaz Jaleel meet Chandrakant Khaire : इम्तियाज जलील यांनी चक्क चंद्रकांत खैरेंची गळाभेट घेतली अन् म्हणाले...

राज्यातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, आणि त्यांच्यासोबत अर्धी काँग्रेस पार्टी असल्याचा टोला शाह यांनी लगावला. तीन तिगडा काम बिघडा या प्रमाणे उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष अर्धे होतेच पण त्यांनी आता काँग्रेसलाही अर्ध करून टाकलं. ही अशी रिक्षा विकास कसा करू शकेल? असा चिमटा अमित शाह(Amit Shah) यांनी महाविकास आघाडीवर टीका करतांना काढला. तुमच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी कश्मिरमधून कलम 370हटवले, पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद, देशाच्या विविध राज्यातील नक्षलवाद संपवला.

देशात राम मंदिर व्हायला पाहिजे होतं की नाही? असा सवाल करत मोदींनी राम मंदिर बनवून दाखवले. तर काँग्रसने(Congress) राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमंत्रणही स्वीकारले नाही. त्यांना वोट बॅंकेची चिंता होती, असा टोला लगावतानाच काशी, वाराणसी, काॅरिडोअर प्रमाणेच सोमनाथ मंदिर सोन्याचे करण्याचे काम सुरु असून देशातील सर्व तीर्थक्षेत्राचा विकास याच पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले.

Amit Shah
Amit Shah Nanded Sabha : अमित शाहांची तोफ धडाडली, 'ठाकरे-पवार महाराष्ट्राचा विकास करू शकत नाहीत'

महाराष्ट्राच्या विकासासाठी लाखो कोटींचा निधी केंद्रातील मोदी सरकारने दिला. उद्धव ठाकरे, शरद पवार व त्यांच्यासोबत असलेली काँग्रेसची मंडळी महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारच राज्याचा विकास करू शकते.

औरंगाबाद, उस्मानाबादचे आम्ही संभाजीनगर, धाराशिव असे नामांतर केले. बाळासाहेबांची मागणी असताना शरद पवार विरोध करायचे, पण आम्ही ते केले. पण उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर आंनद दिसत नाही, अशी खोचक टीका करत प्रताप पाटील चिखलीकर यांना विजयी करून 'चारसो पार'ला हातभार लावा, असे आवाहन शाह यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com