Amit Shah News : नांदेडच्या अमित शाहांच्या सभेवरून चिखलीकर-चव्हाण यांच्यात कलगीतुरा

Amit Shah in Naded : अशोक चव्हाणांना भाजपकडून आव्हान देण्याची चर्चा
Prataprao Chikhalikar, Ashok Chavan
Prataprao Chikhalikar, Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan vs Prataprao Cikhalikar : भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगानेच नांदेडमध्ये आज शनिवारी (ता. १०) भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होत आहे. या सभेवरून नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. भाजप कमजोर ठिकाणी सभा घेत असल्याची बोचरी टीका केल्यानंतर चखलीकरांनी चव्हाणांना किंमत नसल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

नांदेड येथे अमित शाह (Amit Shah) यांची सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना आव्हान दिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र कुठल्याही पक्षाची सभा होण्यात काही गैर नाही. ते म्हणाले, "राज्यात बीआरएसच्या तीन सभा झाल्या. त्यात नांदेडचाही समावेश होता. आता निवडुका आल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष कामाला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सभा होत आहे. त्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावत आहे."

Prataprao Chikhalikar, Ashok Chavan
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा राष्ट्रीय मान्यता मिळवण्याची तयारी; 'या' नेत्यांना दिली जबाबदारी

कमजोर ठिकाणी भाजप (BJP) सभा घेत असल्याचेही बोचरी टीका अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी यावेळी केली. चव्हाण म्हणाले, "प्राथमिक माहितीनुसार भाजपने ज्या जागा कमजोर आहे, त्या जागांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. असे प्रत्येक पक्ष करत असतो. त्यानुसार राज्यात भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या चार-पाच सभा होत आहेत. निवडणूक जिंकणे हे मोठे आव्हान असते. त्याची पूर्व तयारी सर्व पक्षांकडून केली जाते."

चव्हाण यांनी केलेल्या टीकेचा खासदार चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांनी समाचार घेतला. नांदेड लोकसभा भाजपच जिंकणार आहे. जनतेने नाकारलेल्या अशोक चव्हाणांना महत्त्व नाही, अशी टीका प्रतापराव चिखलीकर यांनी केली. ते म्हणाले, "मोदी अॅट ९ च्या संदर्भातून देशभरात कार्यक्रम राबविले जात आहे. त्याच अनुषंगाने नांदेड येथे आज भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांन नांदेडला भरभरून देण्याच प्रयत्न केला."

Prataprao Chikhalikar, Ashok Chavan
Nana Patole News : स्वबळाची भाषा नाना पटोलेंना अडचणीची ठरतेय का?

यावेळी चिखलीकरांनी भाजपच नांदेडमध्ये निवडून येणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, "अशोक चव्हाण काय म्हणताय त्याला फार महत्व नाही. एकदा जनतेने नाकारलेल्या माणसाने असे बोलावे हे कुणालाही मान्य होणार नाही. नांदेडच्या जागा भाजप जिंकेल. पक्ष कुणाला उमेदवारी देईन माहिती नाही, मात्र विजय भाजपचा होणार आहे. नांदेडमधून भाजचे तीन विधानसभा सदस्य आहेत. एक लोकसभा सदस्य आहे. मोदींच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमुळे जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com