Raosaheb Danve News : अमित शाहांचा 'भला आदमी' रावसाहेब दानवे आता 'बडा आदमी' होणार !

Jalna News : भाजपची सत्ता आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर रावसाहेब दानवे यांच्यावर मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत शाह यांनी दिले.
Raosaheb Danve
Raosaheb Danvesarkarnama

Jalna Political News : महायुतीचे जालना लोकसभेचे सहाव्यांदा उमेदवार असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. प्रेमाने दानवे यांचा 'भला आदमी' असा उल्लेख करणाऱ्या शाह यांनी स्वतःहून जालन्यात दानवे यांच्यासाठी सभा दिली. या सभेत भाषणाच्या शेवटी अमित शाह यांनी एक महत्वाची घोषणा केली. Jalna Political News

'जालनावालो रावसाहेब दानवे Raosaheb Danve को छट्टी बार चुनको दोगे ना? उनको भारी मतो से जिताओ, मै आपको बता रहा हू वो बहुत बडे नेता बनने वाले है,' असे सांगत केंद्रीत पुन्हा भाजपची सत्ता आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर रावसाहेब दानवे यांच्यावर मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत शाह यांनी दिले. त्यामुळे अमित शाह यांचा भला आदमी आता बडा आदमी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री व राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनीही आपल्या भाषणात रावसाहेब दानवे यांचे कौतुक करत दानवे हे जालन्याची, मराठवाड्याची शान असल्याचे सांगितले. एकूणच काल जालन्यात झालेली महाविजय संकल्प सभा म्हणजे सबकुछ रावसाहेब दानवे अशीच होती असे म्हणावे लागेल. रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे.

या पंचवीस वर्षात त्यांना पक्षाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद, केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री होण्याची संधी दिली. शिवाय जालन्यातून सहाव्यांदा दानवे यांनाच उमेदवारी देत पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला. येत्या 11 रोजी जालना मतदारसंघासाठी प्रचार संपणार आहे. शेवटच्या टप्यात अमित शाह यांनी स्वतः जालन्यात दानवे यांच्यासाठी सभा घेण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या हमखास निवडून येणाऱ्या जागांमध्ये जालन्याच्या जागेचा समावेश केला जातो.

Raosaheb Danve
Manoj Jarange : बायका-पोरांवर हल्ला घडवून खच्चीकरण अन् खोटे व्हिडिओ करुन बदनामीचे षडयंत्र; जरांगेंचा गंभीर आरोप

काँग्रेस महाविकास आघाडीने यावेळी माजी आमदार आणि 2009 मध्ये दानवे यांना कडवी झुंज देणारे डाॅ. कल्याण काळे Kalyan Kale यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे उद्या (ता.10) त्यांच्यासाठी जालन्यात सभा घेत आहेत. अमित शाह यांनी या सभेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला होता. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असलेल्या जालना मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाह यांच्या सभेचे वैशिष्ट सांगायचे झाले तर यात भाजपच्या दोन्ही नेत्यांनी दानवे यांचे कौतुक केले. अमित शाह Amit Shah यांनी दानवे यांना निवडून दिल्यास जालन्याला प्रत्येक्ष क्षेत्रात टाॅपवर नेण्याची ग्वाही, शाह यांनी दिली. एवढेच नाही, तर दानवे सहाव्यांदा विजयी झाले तर ते खूप मोठे नेते होणार आहेत, असे सांगत त्यांना केंद्रात बढती देणार असल्याचे संकेत दिली. शाह यांच्या या दिलदारपणामुळे दानवे समर्थकांच्या आनंदाला उधाण आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Raosaheb Danve
Prithviraj Chavan News : भाजपला बहुमत मिळणे अशक्यच; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली 'ही' कारणं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com