Manoj Jarange : बायका-पोरांवर हल्ला घडवून खच्चीकरण अन् खोटे व्हिडिओ करुन बदनामीचे षडयंत्र; जरांगेंचा गंभीर आरोप

Maharashtra Political News : सध्याच्या निवडणुकीत मराठा विरोधी भाषणबाजी सुरू आहे. सध्या सर्वत्र मरठ्यांविरोधात भाषणबाजी सुरू आहे. मात्र, काही लाळघोटे पुढारी पुढच्या रांगेत बसून ऐकतात.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama

Beed Political News : आपले खोटे - नाटे व्हिडिओ तयार करून बदनामीच षड्यंत्र रचले आहे. याशिवाय माझ्या बायका पोरावर हल्ला करून माझं खच्चीकरण करण्याचा डावही आखला जातोय आहे. मात्र काहीही झालं तरी मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला Maratha Reservation विरोध केला त्यांना पाडा, असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विविध गावांत दौरे केले. त्यांच्या अंभारो (ता. आष्टी) येथे जरांगे पाटलांच्या Manoj Jarange सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यापूर्वी त्यांनी पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील सभेत वरिल आरोप केला. मनोज जरांगे यांनी सुरुवातीला पंतप्रधानाच्या आंबेजोगाई येथील वक्तव्यावर भाष्य केले. 'काही लोक मागच्या दारातून ओबीसीचे आरक्षणात वाटेकरी होऊ पहात आहेत. या त्यांच्या वक्तव्यावर जरांगे म्हणाले, आम्ही मागच्या दारातून नाही, राजरोसपणे पुढच्या दारातून ठोकून आरक्षण घेतले आणि घेणार आहोत.

सध्याच्या निवडणुकीत मराठा विरोधी भाषणबाजी सुरू आहे. सध्या सर्वत्र मरठ्यांविरोधात भाषणबाजी सुरू आहे. मात्र, काही लाळघोटे पुढारी पुढच्या रांगेत बसून ऐकतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. मात्र, मराठ्यांना हे सगळं कळलेलं आहे. वेळ आल्यावर मराठे अशा पुढा-यांना हिसका दाखवतील. गाव पातळी मराठा विरुद्ध इतर जाती असा संघर्ष लावण्याचाही प्रयत्न झाला मात्र आम्ही गाव पातळीवर सर्व एकमेकांत आहोत. त्यामुळे राजकारण्यांचा हा डावही फसला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange
Ajit Pawar News : मंत्री व्हायला निघाला.. आरं तू आमदारच कसा होतो तेच बघतो; अजितदादांचा अशोक पवारांना दम

मराठा समाज कधीही भाजपच्या BJP विरोधात नव्हता. अथवा त्यांचे 105 आमदार आलेच नसते. पण तुम्ही षडयंत्र करून आमच्या लेकरा बाळावर हल्ला केला. गोळीबार केला, माझ्यावर एसआयटी बसवली, राज्यभरात माझ्या मराठा पोरांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला. आता तर माझे खोटे व्हिडिओ तयार करून बदनामीच षडयंत्र रचले जात आहे. सोबतच माझ्या बायको मुलावर हल्ला करण्याचा डावही रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange
Prithviraj Chavan News : भाजपला बहुमत मिळणे अशक्यच; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली 'ही' कारणं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com