Crime News : पोलीसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाचा एन्काऊंटर केला!

Amol Khotkar, a suspect in the Waluj robbery case, was killed in a police encounter. His sister has alleged that the police took money and murdered him. पोलिसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाला मारलं, असा दावा रोहिणी खोतकर हिने केलाय. संशयीत आरोपी अमोल यांने पोलीस मागावर असताना गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शहराजवळील वाळूज भागात उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोराचा पोलीसांनी एन्काऊंटर केला. अमोल खोतकर असे या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीसांच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली असताना आता आरोपीच्या बहिणीने पोलीसांनी सुपारी घेऊन आपल्या भावाचा एन्काऊंटर केल्याचा आरोप केला आहे. या आरोपाने प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी दरोडा (Crime News) पडला होता. यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील संशयित आरोपी अमोल खोतकर याचा पुणे शाखेच्या पथकाने एन्काऊंटर केला. सोमवारी रात्री झालेल्या या घटनेवर संशयित आरोपी अमोल खोतकर यांच्या बहिणीने गंभीर आरोप केले.

पोलिसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाला मारलं, असा दावा रोहिणी खोतकर हिने केलाय. दरोडाच्या घटनेतील संशयीत आरोपी अमोल खोतकर यांने पोलीस मागावर असताना गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला. (Chhatrapati Sambhajinagar) प्रत्युत्तरात पोलीसांनी केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संशयीत आरोपी अमोल खोतकर एका हॉटेलमध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Crime News
Crime News : महाराष्ट्रात आणखी एका सुनेचा छळ, नर्स सासुने घरातच केला गर्भपात ; गोळ्या दिल्या, सलाईन लावले अन्..

रात्री अकरा वाजता खोतकर वडगाव कोल्हाटी येथे हसबे यांच्या हॉटेल जवळ कार घेऊन आला असता पोलिसांना समोर पाहताच त्याने गोळी झाडली. कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एसपीआय रविकिरण गच्चे यांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला आणि यात खोतकरचा मृत्यू झाल्याचे पोलीसांकडून सांगीतले जात आहे. मात्र या सगळ्या घटनाक्रमावर अमोल खोतकरची बहिण रोहिणी खोतकर हिने संशय व्यक्त करत थेट पोलीसांवर आरोप केले.

Crime News
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट; सर्वोच्च न्यायालयानं मुंबई हायकोर्टाचा निकाल बदलला

आज पहाटे 15 ते 20 पोलीस आमच्या घरी आले. त्यांनी सगळं सामान सर्वत्र फेकून दिल. भाऊ अमोल खोतकर किरकोळ जखमी झालाय त्याला घाटीत दाखल केल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले. पण तो शवविच्छेदन गृहात असल्याचे आम्हाला कळाले. माझा भाऊ गुन्हेगार नव्हता तो व्यवसायिक होता. वाळूज परिसरात त्याचे हॉटेल होते. पोलिसांनी त्याला सुपारी घेऊन ठार केला आहे, असा गंभीर आरोप रोहिणी हिने केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com