Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट; सर्वोच्च न्यायालयानं मुंबई हायकोर्टाचा निकाल बदलला

Supreme Court On Akshay Shinde Encounter : बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गेल्या महिन्यात 7 एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारला दणका देत या प्रकरणाशी संबंधित 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Akshay Shinde Encounter
Akshay Shinde EncounterSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नुकतीच सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टानं आता मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं बदलापूर विद्यार्थ्याच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) यांच्या कथित एन्काऊंटर प्रकरण एसआयटी स्थापन करण्याचा निकाल दिला होता. आता त्यात सर्वोच्च न्यायालयानं बदल करताना आता डीजीपी यांच्या देखरेखेखाली समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी सफाई कामगार आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून कल्याण येथे आणताना 23 सप्टेंबर 2024 ला एन्काऊंटर करण्यात आले होते.मात्र,या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर करण्यात आल्यानं राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या सातत्यानं फैरी झडत होत्या.याच पार्श्वभूमीवर अक्षय शिंदेंच्या कुटुंबानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Akshay Shinde Encounter
India Vs Pakistan War: आधीच बिथरलेल्या पाकिस्तानला नवा मोठा धक्का; 'हा' जुना बलाढ्य मित्र भारताच्या मदतीला धावून आला

मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात यापूर्वी सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते. आता सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) या प्रकरणात आता डीजीपी यांच्या देखरेखेखाली समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत

बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गेल्या महिन्यात 7 एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत कोर्टाने राज्य सरकारला दणका देत या प्रकरणाशी संबंधित 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Akshay Shinde Encounter
Gunratna Sadavarte News : 'मराठवाड्या'नंतर सदावर्तेंची 'विदर्भा'त उडी, भळभळत्या जखमेवरच ठेवलं बोट; भाजपची डोकेदुखी वाढणार

याचशिवाय आता या एन्काउंटरची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर आता या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. मात्र,एकीकडे कोर्टाने पोलिसांविरोधात एफआयआर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

तर दुसरीकडे अक्षय शिंदेचे पालक मागील दीड महिन्यापासून बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवाय शिंदेचे कुटुंबीय त्यांची बाजू कोर्टात मांडणाऱ्या वकिलांच्याही संपर्कात नसल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com