Amruta Fadnavis : 'गुंगी गुडिया'पासून 'गुंगा बुढा'पर्यंत... अमृता फडणवीसांनी बीडमधून साधला तिहेरी निशाणा

Amruta Fadnavis Gungi Gudiya remarks: सुनेत्रा पवारांबाबतच्या वक्तव्यावर नाराजी; जंतर-मंतरवरील आंदोलनातील भाषेवर टीका, "समाजसेवा सुरू ठेवणार" अशीही भूमिका.
Amruta Fadnavis Gunga Budha statement
Amruta Fadnavis Gunga Budha statementSarkarnama
Published on
Updated on

Amruta Fadnavis Beed Visit: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या अमृता फडणवीस यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या टिप्पणीचा त्यांनी निषेध केला.

त्याचबरोबर दिल्लीतील जंतर-मंतरवरील Gen-Z विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या भाषेवरही त्यांनी आक्षेप नोंदवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या 'गुंगा बुढा' या वक्तव्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

अमृता फडणवीस यांचा बीड (BEED) जिल्ह्याचा हा पहिलाच दौरा होता. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून आयोजित महाआरोग्य शिबिरात त्यांनी उपस्थिती लावत जिल्ह्यातील विविध प्रश्नांची माहिती घेतली. विशेषतः ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच गार्गी जाधवच्या उपचारासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या टिप्पणीवर बोलताना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या की, महिलांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र महिलांचा अवमान करणारी भाषा स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Amruta Fadnavis Gunga Budha statement
PM Vishwakarma scam : PM विश्वकर्मा योजनेच्या नावावर महिलांची लाखोंची फसवणूक; कर्ज-नोकरीचे आमिष दाखवणारी महिला अटकेत

दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या Gen-Z विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेचाही त्यांनी निषेध केला. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी वैयक्तिक पातळीवरील अशा प्रकारच्या वक्तव्यांना स्थान नसल्याचे त्यांनी सांगितले.

Amruta Fadnavis Gunga Budha statement
Modi Gen Z Video : 'फेसबुक मुख्यमंत्री' म्हणणारे आज इन्स्टाग्रामवर सक्रिय; मोदींच्या सलग 3 व्हिडिओंवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'गुंगा बुढा' अशी टीका केली होती. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, "संजय राऊतसाहेबांबद्दल बोलण्यापेक्षा गुंगं राहिलेलंच बरं."

राजकारणातील भूमिकेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, "जेव्हा जास्त अन्याय होतो, तेव्हाच मी बोलते. पदामुळे सत्ता मोठी होते आणि त्या पदावर असलेल्या व्यक्तीची जबाबदारीही वाढते. मला सक्रिय राजकारणात रस नाही. मात्र समाजसेवेचे कार्य यापुढेही सातत्याने सुरू ठेवणार आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com