माझ्या मागे लाखो कार्यकर्त्यांची फौज, मी सत्तारच्या जीवावर निवडून येत नाही..

राहिला टोपीचा प्रश्न तर ती घायालची की काढायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला पराभूत करण्याचे तर स्वप्न देखील सत्तार यांनी पाहू नये. (Raosaheb Danve)
Raosaheb Danve-Abdul Sattar
Raosaheb Danve-Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : सोयगांव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बहुमतासह भगवा फडकवला. (Shivsena) त्यानंतर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना पराभूत करून डोक्यावरची टोपी काढण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे विधान सत्तार (Abdul Sattar) यांनी नुकतेच केले होते. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे.

अब्दुल सत्तार यांच्या जीवावर मी लोकसभा निवडून येत नाही. माझ्या मागे लोखो कार्यकर्त्यांची फौज आहे, काही झाले तरी लोकसभेला सत्तार माझेच काम करतील, असा दावाही दानवे यांनी केला. नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या वाट्याला फक्त सहा जागा आल्या. रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी देखील सोयगावात येऊन प्रचार केला होता.

दोन केंद्रातले मंत्री येऊनही आपण विजय मिळवलाच, असे सत्तार अभिमानानी सांगत आहेत. बनोटी येथील एका कार्यक्रमात दानवे यांनी नगरपंचायत निवडणुक आणि त्यानंतर सत्तार यांनी केलेलं विधान यावर भाष्य केले.

दानवे म्हणाले, नगरपंचायतीत मिळालेला विजय हा काही शिवसेनेचा एकहाती वगैरे नाही, आमचे सहा उमेदवार अवघ्या १५ मतांनी पडले. त्यामुळे नगरपंचायतीतील विजयाने हुरळून जाऊन मला पराभूत करण्याची, माझ्या विरोधात लढा असे आव्हान देण्याची भाषा सत्तार यांनी करू नये.

Raosaheb Danve-Abdul Sattar
कुणी काय करावे हे खासदारांनी शिकवू नये? त्यांनी लोकवर्गणीतून शाळा उभारावी..

गेली पंचवीस वर्ष मी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून येतो, ते काही सत्तार यांच्या भरवशावर नाही. लाखो कार्यकर्त्यांची फौज मी तयार केलेली आहे, ते मेहनत घेतात, आम्ही लोकांची कामं करतो, तेव्हा मताधिक्याने विजयी होतो.

तेव्हा उगाच सत्तार यांनी आव आणू नये. राहिला टोपीचा प्रश्न तर ती घायालची की काढायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला पराभूत करण्याचे तर स्वप्न देखील सत्तार यांनी पाहू नये, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com