Manoj Jarange Patil : ... अन् मनोज जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरळले !

Maratha Reservation : नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल चार सभा झाल्या.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्रातील विविध भागात मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. या मागणीसाठी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाज आक्रमक झाला असून, काही ठिकाणी नेतेमंडळींना गावबंदी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल चार सभा झाल्या.

शहरातील जिजाऊनगरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी जागृत राहून एकजुटीने काम करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड येथील सभेत केले. भाषण करीत असताना ते थोडा वेळ भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. या प्रसंगाने उपस्थित जनसमुदायसुद्धा भावनिक झाला.

Manoj Jarange Patil
BJP : खासदारकी गेली, आता घरे खाली करा; भाजपच्या ‘त्या’ नेत्यांना नोटीस

मराठा समाजाला मी माय बाप मानले. समाजाने मला भरपूर प्रेम दिले. माझ्या पाठीशी उभे राहिले. मी आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचभर मागे हटणार नाही. माझ्याकडे संपत्ती नाही, पण लोकांचे प्रेम आहे. या प्रेम व पाठिंब्यावर हा लढा सुरू आहे. आरक्षणच्या मुद्द्यावरून समाजाची एकजूट झाली आहे. ती कायम ठेवा. नेत्यांचे‌ ऐकू नका. ते फूट पाडण्याचे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सभेला मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले, संसदेचे व विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात खासदार, आमदार मंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आवाज उठवावा. यासाठी हीच योग्य वेळ व संधी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर हा समाज तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही.आपल्या लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी जागृत राहून संघटित व्हावे लागेल. जे‌ आपणास विरोध करीत आहेत, त्यांना लक्षात ठेवा. विरोध‌ करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देण्यात येईल, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही'

राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणचा कायदा पारित करून दिलेला शब्द पाळावा. राज्यातील मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सभेची व्यवस्था केली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. त्यासोबतच चोख असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

(Edited by Sachin Waghmare)

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : ''मला जर शांतता ठेवायची नसती आणि मी जर त्या पोरांना...'' ; मनोज जरांगेंचं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com