BEED Politics : मंत्री मुंडे अन् आमदार धसांची छुपी डील काय आहे? अंजली दमानियांनी सर्व काही सांगितलं

Anjali Damania political deal Beed Minister Dhananjay Munde BJP MLA Suresh Dhas : मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात चंद्रशेखर बावनकुळेंसमोर झालेल्या डीलवर अंजली दमानिया यांचा हल्लाबोल.
MLA Suresh Dhas
MLA Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीवरून मंत्री धनंजय मुंडेंवर भाजप आमदार सुरेश धस यांनी चांगलाच हल्लाबोल करत माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. पण हेच सुरेश धस यांची मंत्री मुंडेंबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी झालेल्या भेटीची माहिती पुढे आली आहे.

यावरून आमदार धस यांच्या भूमिकेवर टीका होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दोघांच्या भेटीमागील संपूर्ण राजकीय डील काय आहे, यावर बेधडक भाष्य करत खळबळ उडवून दिली.

अंजली दमानिया यांनी मी सुरेश धस (Suresh Dhas) यांना 2012 पासून ओळखते. कुठे ना कुठे वाटत होते की, काहीतरी आहे. ही व्यक्ती, एका सामान्य व्यक्तीला न्याय मिळून देईल, असे मला कधीही वाटले नाही. हेच मी धनंजय देशमुख यांना पहिल्या दिवशी बीडला भेटले होते, तेव्हांच सांगितले होते की, हा माणूस कधीही पटलेल. आणि तसंच झालं, असे झाले.

MLA Suresh Dhas
Anjali Damania : पूर्वी 342 कोटींचा, आता नवीन 200 कोटींचा, मंत्री मुंडेंचा आणखी एक घोटाळा; अंजली दमानिया म्हणाल्या, 'आता वाचूच शकत नाही'

'कराड, मुंडे (Dhananjay Munde) आता करत आहेत, तेच धस देखील करतात. इतर राजकीय मंडळी जी मोर्चात होती, ते देखील तेच करतात. त्यामुळे मी माझी भूमिका घेतली होती की, मी मोर्चात जाणार नाही. माझा लढा रस्त्यावर बसून होता, त्यामुळे स्टेजवर न जाता मागे राहून रस्त्यावर बसून आंदोलन केले', असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

MLA Suresh Dhas
Top 10 News : राष्ट्रवादीनं घेतलाय धसका; 'एकला चलो'ची तयारी सुरू; दिल्लीतील शपथविधी सोहळाही भाजप गाजवणार - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

धसांचा सेटलमेंटसाठी खटाटोप

'जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड कसे आहे, हे सर्वांना माहीत आहे. हा सगळा राजकीय ड्रामा होता. धसांना कल्पना नव्हती की, हे प्रकरण एवढं मोठं होईल. माध्यम हे प्रकरण एवढं लावून धरतील. त्यांना वाटलं हा मुद्दा अधिवेशनात उचलला की, समोरून कोठे तरी सेटलमेंट होईल', असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.

कराड याची धसांच्या भागात एन्ट्री

'बहुतेक कराड हा त्यांच्या भागात काम करायला लागला होता. ते थांबवण्यासाठी धसांनी, अशी भूमिका घेतली की, अधिवेशनात प्रश्न विचाराला. म्हणजेच समोरून सेटलमेंट होऊन, तो तुमच्या भागात येणार नाही, तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम करू, ही राजकीय सेटलमेंट होती. तुमची कॉन्ट्रॅक्ट तुमची, आमची कॉन्ट्रॅक्ट आमची. तुम्ही थोडं खा, आम्ही थोडं खाऊ, हे जो सगळा ड्रामा करण्याची सुरवात केली. पण त्यांना कल्पना नव्हती, माध्यमं, लोकं हा विषय इतका लावून धरतील, आणि हे वाढायला लागलं. मग अस्वस्थ होऊन, बावनकुळे यांच्या मध्यस्थीने छान गप्पागोष्टी झाला. चार-चार तास बैठका झाल्या. ही राजकीय सेटलमेंट झाली', असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com