Anjali Damania : पूर्वी 342 कोटींचा, आता नवीन 200 कोटींचा, मंत्री मुंडेंचा आणखी एक घोटाळा; अंजली दमानिया म्हणाल्या, 'आता वाचूच शकत नाही'

Anjali Damania alleging corruption Beed Minister Dhananjay Munde Agriculture Minister CM Devendra Fadnavis DCM Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.
Anjali Damania
Anjali DamaniaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री काळात आणखी एक घोटाळा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणला आहे. धनंजय मुंडे हा भ्रष्ट माणूस आहे, त्याला कोणत्याही पदावर बसण्याचा अधिकार नाही. इफकोमध्ये महाघोटाळा केला आहे. यातून धनंजय मुंडे वाचू शकत नाही.

पूर्वीचा 342 कोटींचा, हा अ‍ॅडिशनल 200 कोटी रुपयांचा आहे. तो खोटा अध्यादेशावर केला आहे. मंत्री धनंजय मुंडेंवर योग्य कारवाई होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी कोणतीही अपेक्षा या सरकारकडून ठेवू नये, असा टोला अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.

'इफको'मध्ये अनेक घोटाळा झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. घोटाळ्यांवर घोटाळे, असा टोला दमानिया यांनी लगावला. 'सीबीआय'मध्ये देखील याबाबत 'एफआयआर' दाखल झालेला आहे. लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत देखील प्रश्न विचारले गेले आहेत. 'इफको'मध्ये कसा घोटाळा होता, याचे सर्व डिटेल्स आहेत. इफको हे नावाला सहकार आहे. तिथले 'सीईओ'पासून लोक कसे घोटाळे करतात, याचे डिटेल्स असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.

Anjali Damania
Shivsena Politics : बाळासाहेबांच्या इच्छेविरुद्ध उद्धव यांची 'ती' कृती, त्यामुळेच शिवसेना फुटली; दीपक केसरकरांचा दावा

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भन्नाट काम केले आहे. नॅनो युरियाचा घोटाळा झाला. आता कृषी घोटाळा नंबर दोन, असे सांगून मंत्री मुंडे यात कोणत्याही परिस्थितीमध्ये यातून वाचत नाहीत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. मंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रावर तारीख नसल्याचा दावा करताना, दमानिया यांनी ते पत्र पत्रकार परिषदेत दाखवले.

Anjali Damania
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : मंत्री विखेंचं शस्त्रपूजन, तर शिवजयंतीनिमित्तानं दीपोत्सव अन् पदयात्रा...

23 आणि 30 सप्टेंबर 2024 मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले. 23 आणि 30 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाच्या कोणत्याही प्रस्तावाचे इतिवृत्तावर कोणताही निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नसताना देखील मंत्री मुंडे यांनी खोटे आदेशाने कार्यवाही करण्याचा लेखी आदेश दिला, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

मंत्र मुंडेंच्या तारीख नसलेले पत्रावरून अध्यादेश

बॅटरी आॅपरेटर पंप आणि अकोला इथल्या पंजाबावर कृषी विद्यापीठ सौरपंपाबाबत आदेश दिले. शेतकरी यापासून वंचित राहू नये, असे आदेशात म्हणत, कार्यवाही आजच करण्यात यावी, असे म्हटले. पण तारीख नसलेल्या पत्रावरून 11 आॅक्टोबरचा अध्यादेश काढण्यात आल्याचा दावा, अंजली दमानिया यांनी केला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयच नाही

या अध्यादेशानुसार 500 कोटी अतिरीक्त देण्याची मागणी आणि 200 कोटी होते. त्यातून बॅटरी पंप आणि सोलार घेते गेले ते वेगळे. परंतु हे दोन्ही निर्णय याच अध्यादेशातून मंजूर करण्यात आले. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कोणतीही मंजूर झालेली नाही, याकडे अंजली दमानिया यांनी लक्ष वेधले आहे.

मंत्री मुंडेंनी खोटं बोलून अध्यादेश काढला

मंत्री मुंडे म्हणतील, हे पत्र आहे. हे पत्र सचिव कृषींकडे पाठवण्यात आले होते. 23 तारखेचे. यानुसार निर्णय एक आणि निर्णय दोन झाले आहेत. निर्णय दोन 500 कोटी रुपये अतिरीक्त मिळावा. हे सर्व सोडून, दुसरा जो निर्णय आहे, त्यात 'अ' 'ब' 'क', त्यामध्ये 200 कोटींचा कुठलाही नवीन प्रस्ताव नाही. सरकार मान्यता नाही. मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नाही. म्हणजे खोटे बोलून, धनंजय मुंडे यांनी त्यावर अध्यादेश काढून घेतात. इतकी लिमिट झाली आहे की, यांना मंत्रि‍पदावर बसता कामा नये, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

भ्रष्ट माणूस यांना चलतोच कसा?

मंत्री मुंडे यांची मंत्रि‍पदावर बसण्याची पात्रता नसल्याचा घणाघात करताना, इतका भ्रष्ट माणूस, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, असे दाखवू जर भ्रष्टाचार करत असेल, तर असा मंत्री कधीही झाला नाही पाहिजे. कृषी तर नाहीच नाही. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com