Maratha Reservation News : आरक्षणासाठी सर्वाधिक बलिदान दिलेल्या बीड जिल्ह्यातील आणखी एका आंदोलकाचा हृदयविकारने मृत्यू!

Beed district, known for the highest sacrifices in the reservation movement : सतीश देशमुख हे गावातील सहकाऱ्यांसह पिकअप वाहनाने रवाना झाले. जरांगे यांच्या ताफ्यासोबतच त्यांचे वाहन होते.
Maratha Reservation Update News
Maratha Reservation Update NewsSarkarnama
Published on
Updated on

दत्ता देशमुख

Beed News : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सर्वाधिक बलिदान देणारा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची नोंद आहे. आतापर्यंत 64 लोकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिले आहे. आजही मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात कायम सक्रीय असलेल्या सतीश ज्ञानोबा देशमुख (वय 44) या बीड जिल्ह्यातील व्यक्तीचा ऱ्हदयविकाराने मृत्यू झाला.

नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे आज सकाळी ही घटना घडली आहे. सतीश देशमुख हे वरपगाव (ता. केज) येथील रहिवाशी आहेत. (Beed News) त्यांचे वडिल ज्ञानोबा व भाऊ व्यंकटेश दोघेही सैन्य दलातून निवृत्त असल्याने लढाऊ बाणा त्यांच्या घरातच आहे. सतीश देशमुख मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. दोन वर्षांपासून प्रत्येक आंदोलात सतीश देशमुख हिरीरीने सहभागी असतात.

दरम्यान, मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी काल बुधवारी (ता. 27) सतीश देशमुख हे गावातील सहकाऱ्यांसह पिकअप वाहनाने रवाना झाले. जरांगे यांच्या ताफ्यासोबतच त्यांचे वाहन होते. (Maratha Reservation) आज सकाळी नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे त्यांना ऱ्हदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचे बंधू व्यंकटेश देशमुख यांनीही पुण्यात आंदोलनासाठी अनेक बैठका घेतल्या. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, वडिल व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी 2018 पासून जिल्ह्यातील 64 समाज बांधवांनी आरक्षण मागणीसाठी बलिदान दिल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे.

Maratha Reservation Update News
Maratha Reservation Protest: जरांगेंना मुंबईच्या बाहेरच रोखण्यासाठी फडणवीसांनी लावली पूर्ण ताकद; शिर्डीत दोन दिग्गज नेत्यांमध्ये 'प्लॅन' ठरला?

फडणवीस जबाबदार..

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com