Beed Crime News : बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका; अवादा कंपनीतील प्रकल्पावरील चोरीनंतर कारवाईचा प्रस्ताव

Authorities in Beed initiate MCOCA action against another robbery gang following a theft incident at Avada Company's project site : या टोळीने पवनचक्की प्रकल्पांवरुन कॉपर वायर चोरीची ही चौथी घटना आहे. आरोपींकडून 11 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड गँग, बीडमधील आठवले गँग आणि आष्टी तालुक्यातील खुन प्रकरणातील टोळीवर मकोका नुसार गुन्हा नोंद केल्यानंतर आणखी एका दरोडेखोरांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. विडा (ता. केज) येथील अवादा कंपनीच्या उभारणी सुरु असलेल्या पवनचक्कीवरुन ता. सात एप्रिल रोजी सुरक्षा रक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव याांचे हात - पाय बांधून 13 लाख रुपयांचे कॉपर वायर व इतर साहित्याची चोरी झाली होती.

चोरी करणाऱ्या 14 जणांच्या टोळीपैकी 10 जणांची ओळख पटविण्यात आली असून यातील चौघांना अटक करण्यात आली. (Beed News) या चोरट्यांचा यापूर्वीही पवनचक्की प्रकल्पांवरुन साहित्य चोरीचा इतिहास आहे. बोरखेड (ता. बीड) येथील विज रोहित्र चोरी प्रकरणी नेकनूर, मस्साजोग प्रकल्पावरील काॅपर वायर चोरी प्रकरणी केज व पाटोदा पोलिस ठाण्यातही असाच गुन्हा नोंद असल्याचे समोर आल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

या टोळीने पवनचक्की प्रकल्पांवरुन कॉपर वायर चोरीची ही चौथी घटना आहे. आरोपींकडून 11 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Police) बबन सरदार शिंदे (वय 40, रा. नांदूर, ता. केज), धनाजी रावजी काळे (वय 23, रा. वाशी, जि. धाराशिव), मोहन हरी काळे (वय 30, रा. वाशी, जि. धाराशिव) व लालासाहेब सखाराम पवार (वय 26, रा. दसमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी स्थानिक गुन्हा शाखेने अटक केलेल्यांची नावे आहेत. चौदा जणांच्या टोळीने चोरी केली. यापैकी 10 जणांची ओळख पटल्याचे नवनीत कॉंवत म्हणाले.

Beed Crime News
Beed Kidnapping News : बीडमध्ये आणखी एक मारहाणीचा प्रकार, जनावरासारखी मारहाण करून तरुण फरार

देशमुख हत्येमुळे कंपनी चर्चेत

वाल्मीक कराडने याच कंपनीच्या व्यवस्थापकाकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतली. त्यावरुन त्याचा साथीदार सुदर्शन घुलेने या ठिकाणी भांडणही केले. खंडणीला अडसर ठरल्याने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याने ही कंपनी चर्चेत आलेली आहे. दरम्यान, पवनचक्की कंपन्यांना सेफ्टी ऑडीटच्या सुचना दिल्या आहेत. सुरक्षा रक्षकांचे चारित्र पडताळणी, ्प्रकल्पांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. विडा येथील पवनचक्कीवरील सीसीटीव्ही बंद होते, असेही त्यांनी नमूद केले.

Beed Crime News
Walmik Karad Latest Update : ''..त्यामुळे वाल्मिक करडाला कधीही मारलं जाऊ शकतं'' ; 'या' व्यक्तीच्या विधानाने खळबळ!

या टोळीने आतापर्यंत चोरी, दरोडे, माराहाणी, वाटमारी अशा प्रकारचे 27 गंभीर गुन्हे केल्याची नोंद पोलिस डायरीत आहे. सर्वाधिक गुन्हे धाराशिव जिल्हा हद्दीतील आहेत. चौघांना अटक केली असून मकोका नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात आली, असल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी सांगितले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com