
Trupti Desai Shocking Statement on walmik Karad : बीड मधील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याची सुपारी आपल्याला देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यासाठी आपल्याला पाच, दहा, पन्नास कोटी इतकी रक्कम मिळू शकली असती मात्र आपण त्याला नकार दिला असल्याचा देखील त्यांनी सांगितले आहे. या दाव्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणांमध्ये काही गंभीर आरोप केले आहेत.
तृप्ती देसाई म्हणाल्या, वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर होऊ शकतो असं एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ते अधिकारी किती खरं बोलतात किंवा खोटं हे माहीत नाही. मात्र वाल्मीक कराड याचा खून होऊ शकतो. याची भीती मी यापूर्वी देखील व्यक्त केली होती.
तसेच, या प्रकरणांमध्ये मोठमोठे मोहरे आहेत त्यांचं नाव वाल्मीक कराड घेऊ शकतो आणि त्यात त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे वाल्मीक कराड यांच्या जवळची टीमच त्याच्या एन्काऊंटरची सुपारी देऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही. असंही तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.
याशिवाय, ''वाल्मीक कराड याला एक दुर्धर आजार आहे. सध्या बीडच्या कारागृहामध्ये त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. मात्र जो दुर्धर आजार वाल्मीक कराडला आहे. त्या आजारामध्ये माणूस श्वास घ्यायचं विसरतो. त्यामुळे श्वसनाचं त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृतावस्थेत मिळाला अशी घोषणा पोलीस करू शकतात. त्यामुळे वाल्मीक कराडला कधीही मारलं जाऊ शकतं.'' असा गंभीर दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये जर वाल्मीक कराडला मारलं तर ही केस संपूर्णपणे संपू शकते. त्यामुळे वाल्मीक कराड याचा एन्काउंटर कधी होऊ शकतो. तसंच निलंबित पोलिस अधिकारी रंजीत कासले यांचे म्हणणे जरं खरे असेल तर त्यांना एन्काउंटरची सुपारी कधी देण्यात आली? कोणी दिली आणि त्यांनी याबाबतची कल्पना वरिष्ठांना का दिली नाही ही? याची देखील चौकशी होणं आवश्यक असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.