Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेच्या भाजपच्या संचालकाची अशी ही बनवाबनवी

Chhatrapati Sambhajinagar News: गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात गाजत असलेल्या मलकापूर बँक तळ्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने घोटाळ्यातील आरोपींवर मोठी कारवाई केली आहे.
Abhishek Jaiswal
Abhishek JaiswalSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News: गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात गाजत असलेल्या मलकापूर बँक तळ्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेत संचालक असलेला भाजपचा पदाधिकारी अभिषेक जयस्वाल (Abhishek Jaiswal) व त्याच्या भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे पाच वर्षांपूर्वी तब्बल नऊ कोटी रुपयांचे कर्ज जयस्वाल यांनी उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वेदांतनगर पोलिस ठाण्यात अभिषेकसह त्याची पत्नी, भाऊ , बँकेचे मुख्य अधिकारी, शाखा व्यवस्थापक अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने मुख्य आरोपी अभिषेक जयस्वाल (Abhishek Jaiswal) व त्याच्या भावाला 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावले आहे. 10 जानेवारी 2019 रोजी अभिषेक जयस्वाल व त्याचा भाऊ अंबरीश यांनी नऊ कोटींचे कर्ज बनावट कागदपत्रे सादर करत उचलले होते. हे कर्ज उचलताना तारण म्हणून ज्या जमिनीचे कागदपत्र अभिषेक जयस्वालने बँकेकडे दिले होते, त्याचा मालक दुसराच असल्याचे स्पष्ट झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करून कोट्यवधीचे कर्ज उचलल्याचे लक्षात येतात जमिनीचा मूळ मालक फझल जुबेर अहमद यांनी बँकेत आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बँकेची यंत्रणा हादरली. शहरातील कोकणवाडी शाखेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मलकापूर बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करायला लावला.

Abhishek Jaiswal
Sanjay Raut: ...म्हणून मोदी-शहा महाराष्ट्राला घाबरतात, संजय राऊतांचा हल्लाबोल

जयस्वाल यांनी शक्ती एजन्सीच्या नावावर हे कर्ज उचलल्याचे समोर आले आहे. हे कर्ज उचलताना यांनी जामीनदार म्हणून पत्नी श्वेता व भाऊ अंबरीश यांना दाखवले होते. समर्थनगरमधील एका प्लॉटची कागदपत्रे हे कर्ज उचलताना तारण ठेवण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मूळ मालक शेख यांनी मार्चमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. अभिषेक जयस्वाल हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँकेचा संचालक असून, भाजपचे वरिष्ठ नेते भाऊ बागडे यांचा त्यांनी निवडणुकीत पराभव केला होता.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com