Sanjay Raut On Amit Shah And Narendra Modi: अमित शाह तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे. मराठी माणसाला राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, संघर्ष शिकवू नका. तुम्ही आयत्या बिळावर बसलेले नागोबा आहात, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री अमित शहांवर (Amit Shaha) हल्लाबोल केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे (Shirdi Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यात सभा पार पडली. या सभेत बोलतना राऊत यांनी मोदींसह शाहांवर टीकास्र डागलं.
राऊत (Sanjay Raut) म्हणाले, देशाच्या लढ्यात महाराष्ट्र नेहमीच पुढे असतो आणि म्हणूनच मोदी शाह महाराष्ट्राला घाबरतात, कारण त्यांची सत्ता उलथून टाकण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. इथे एकदा ठिणगी पडली की वणवा भडकतो, आता तर मशाल पेटली आहे. शिवाय मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अमित शाह तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे. मराठी माणसाला राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, संघर्ष शिकवू नका. तुम्ही सगळे आयत्या बिळावर बसलेले नागोबा आहात, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीच्या (MVA) अकोले तालुक्यात पार झालेल्या सभेत राऊतांनी केंद्र सरकारला आणि भाजपला धारेवर धरलं. देश उभा करण्यात मोदी (Narendra Modi) आणि शाहांचे योगदान काय? शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले की निर्यातबंदी करतात. आता गुजरातच्या पांढऱ्या कांद्यावरील बंदी उठवली. गुजरातची मतं पाहिजेत, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दुःख मोदी-शाहाला कळणार नाही. मोदींना गुजरात (Gujarat) म्हणजेच देश आहे वाटत आणि आपण भारताचे नाही तर गुजरातचे प्रधानमंत्री आहोत, असंही राऊत या वेळी म्हणाले.
महाराष्ट्र लुटून सर्वकाही गुजरातला न्यायचं चाललं आहे. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरू असून मोदी आणि शाह महाराष्ट्राबद्दल सुडाचे राजकारण करत आहेत. औरंगजेबाच थडगं याच महाराष्ट्रात बांधण्यात आलंय. या निवडणुकीत महाराष्ट्र मोदी-शाहांना जागा दाखवून देईल. ही निवडणूक क्रांतिकारी आहे. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे, ते मोदी घडवू शकत नाहीत. नेहरू, शास्त्री, वाजपेयींसारख्या महान पंतप्रधानांची परंपरा देशाला लाभली आहे, मात्र आता रोज खोटं बोलणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभला आहे, अशी बोचरी टीका राऊतांनी मोदींवर केली.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.