मराठवाड्यातील ४५ नगर परिषदा व दोन नगर पंचायतीवर प्रशासकाच्या नियुक्त्या!

प्रशासक म्हणुन ज्या त्या विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या नावाने आदेश काढून प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचित केले आहे. (Marathwada)
Marathwada-Local Body Election

Marathwada-Local Body Election

Sarkarnama

Published on
Updated on

उस्मानाबाद : राज्यात सुरू असलेल्या कोरोना संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नाही. (Maharashtra) शिवाय मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. (Municipal Council) मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.(Marathwada)

त्यानुसार मराठवाड्यातील ४५ नगरपालिका व दोन नगर पंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश सोमवारी (ता. २७) राज्याच्या नगर विकास विभागाने काढले आहेत. प्रशासक म्हणुन ज्या त्या विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या नावाने आदेश काढून प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचित करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक औरंगाबाद व संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

मराठवाड्यातील औरंगाबाद जिह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद. जालना जिह्यातील जालना, अंबड, भोकरदन, परतूर. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली कळमनुरी. बीड जिल्ह्यातील बीड, अंबेजोगाई, माजलगांव, परळी -वैजनाथ, गेवराई, धारूर. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, माहूर या दोन नगरपंचायती.

तर देगलुर, बिलोली, धर्माबाद, हदगांव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी या नगरपालिका. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा या पालिकेत आता प्रशासकाची नियूक्ती होणार आहे. दरम्यान कांही पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपत आहे तर तेथून टप्प्याटप्प्याने ज्या त्या पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुदतीनुसार प्रशासक नियूक्त होतील.

<div class="paragraphs"><p>Marathwada-Local Body Election</p></div>
अतुल सावे भ्रष्टाचारी आमदार, त्यांना निलंबित करा; तरुणाचे टाॅवरवर चढत आंदोलन

जानेवारी व फेब्रुवारी महिन्याहि कांही पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या पालिकेची नावे, दिनांक व प्रशासक अधिकारी पुढीलप्रमाणे : उस्मानाबाद ३० डिसेंबर (मुख्याधिकारी उस्मानाबाद), भूम २९ डिसेंबर (मुख्याधिकारी भूम), कळंब ३० डिसेंबर ( संबंधित उपविभागीय अधिकारी), मुरूम २९ डिसेंबर (तहसीलदार उमरगा), नळदूर्ग २९ डिसेंबर ( संबंधित उपविभागीय अधिकारी), उमरगा २९ डिसेंबर (मुख्याधिकारी उमरगा), परांडा २९ डिसेंबर (मुख्याधिकारी परांडा), तूळजापूर एक जानेवारी ( संबंधित उपविभागीय अधिकारी).

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com