Arjun Khotkar firecracker comparison : फडणवीस, शिंदे अन् पवार 'सुतळी बॉम्ब', उद्धव वाजलाच नाही, राज 'स्फोटक', तर राऊत 'भुई चक्कर'; अर्जुन खोतकरांनी फोडले फटाके

Arjun Khotkar Compares Fadnavis, Shinde, Uddhav, Raj Thackeray and Sanjay Raut to Firecrackers in Jalna : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार अर्जुन खोतकर यांनी राज्यातील राजकारण्यांना फटाक्यांची उपमा देत टोलेबाजी केली आहे.
Arjun Khotkar firecracker
Arjun Khotkar firecrackerSarkarnama
Published on
Updated on

Jalna political news : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जालना जिल्ह्यातील आमदार अर्जुन खोतकर यांनी जोरदार राजकीय फटाके फोडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने वाजायला पाहिजे होते, त्यापद्धतीने वाजले नाहीत. परंतु राज ठाकरे यांना 'स्फोटक' म्हटलं आहे.

महायुतीमधील भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांनी 'सुतळी बॉम्ब' म्हटले आहे. तर खासदार संजय राऊत यांनी 'भुई चक्कर' म्हणत खिल्ली उठवली आहे.

जालना (Jalna) शहरातल्या फटाका मार्केटमध्ये आमदार अर्जुन खोतकर हे त्यांच्या परिवारासह नातवंडांना फटाक्यांची खरेदी करण्यासाठी केली. त्यावेळी त्यांनी फटाक्यांवरून राजकीय टोलेबाजी केली. उद्धव ठाकरे यांचा फटका वाजायला पाहिजे होता, तसा वाजला नाही. अशी खोचक टोला खोतकर यांनी लगावला.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 'भुई चक्कर'ची उपमा देऊन, त्यांनी स्वतःच्या पक्ष्याला गोत्यात आणलं आणि दुसऱ्यालाही गोत्यात आणण्याचा प्रयत्न करत असतात, असाही टोला लगावला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार 'सुतळी बॉम्ब', तर राज ठाकरे 'स्फोटक' फटाका असल्याचे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. दरम्यान फटाका खरेदीवेळी अर्जुन खोतकर अनेक नेत्यांना फटाक्यांची उपमा देत चांगलीच टोलेबाजी केली आहे.

Arjun Khotkar firecracker
CM relief fund war room : आरोग्य योजनांचे एकत्रीकरण, समन्वयासाठी ‘वॉर रूम’; काय आहे प्लॅन...

गोरंट्यालांना सुनावलं

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या युतीबद्दल ज्यांना अधिकार आहे, त्यांनी बोलावं ज्यांना अधिकार नाही, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, असा टोला भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले कैलास गोरंट्याल यांना लगावला. मतांची विभागणी होऊ नये, हा आमचा प्रमुख हेतू आहे, त्यांना खाज असेल, तर त्यांची खाज मिटवून टाकू, असा महायुतीमधील घटक पक्षांना खोतकर यांनी इशारा दिला.

Arjun Khotkar firecracker
TOP 10 News : पहाटेच्या शपथविधीप्रमाणे विधान परिषदेसाठी एका नेत्याचा शपथविधी! ; दिवाळीच्या मुहूर्तावर राजभवनात मोठी घडामोड! अप्पर जिल्हाधिकारीपदी..; वाचा महत्त्वाच्या घडामोडी

खोतकरांचा प्रस्ताव वेटिंगवर

शिवसेनेचे आमदार आपापल्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र, जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपकडे जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव दिला आहे. यावर आता भास्कर दानवे यांनी शिवसेनेच्या प्रस्तावावर आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, आणि ते जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला कळवण्यात येईल, असे म्हणत रस्ताव वेटिंगवर ठेवला आहे.

गोरंट्यालाची स्वबळाची भाषा

आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक असलेले, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गोरंट्याल यांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करत, महापौर आणि सत्ता मिळवून देतो, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला अर्जुन खोतकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com