Arjun Khotkar News : युती करायची की नाही? स्पष्ट सांगा; अर्जुन खोतकरांचा महायुतीला थेट अल्टीमेटम?

Arjun Khotkar Mahayuti ultimatum : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महायुतीला युतीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याचा थेट अल्टीमेटम दिला असून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Arjun Khotkar
Arjun Khotkar Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : राज्यातील नेत्यांनी महापालिका निवडणुकात एकत्र लढण्याच्या घोषणा केल्या. स्थानिक पातळीवर एकमेकांशी जुळवून घ्या, अशा सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या होत्या. आम्ही नेत्यांचे आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत. परंतु स्थानिक पातळीवर भाजपकडून कुठलाही प्रतिसाद अनेक ठिकाणी मिळताना दिसत नाहीये. जालना महापालिकेसाठी शिवसेनेने भाजपला दोन महिन्यापुर्वी युतीचा प्रस्ताव दिला होता.

परंतु अद्याप भाजपचा प्रतिसाद मिळालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांचा संयम आता सुटू लागला आहे. युती करायची की नाही? हे स्पष्ट सांगा, आता थांबणे शक्य नाही. युती आम्ही तोडल्याचे पाप आमच्या माथी नको, अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

भाजप युतीसाठी सिरियस नाही, आमचा प्रस्ताव देऊन दोन महिने झाले, पण त्यांच्याकडून अजून प्रस्ताव नाही. नुसत्याच बैठका घेऊन काहीही होणार नाही. युतीची शक्यता आता धुसर होऊ लागली आहे, आम्ही आता स्वतंत्रपणे कामाला लागलो आहोत. भाजपला युती नको असेल, तर त्यांनी ते स्पष्ट सांगावे. आम्हाला काही अडचण नाही, आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत.

Arjun Khotkar
Congress leader death : काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला : महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन

दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद नाही. आता आणखी किती वाट पहायचा हा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांना आता रोखणे, थांबवणे शक्य नाहीत. पंकज भोयर माझे मित्र आहेत, ते काल जालन्यात आल्यावर मी त्यांना चहाचे निमंत्रण दिले होते.

Arjun Khotkar
Surupsingh Naik : अन् मंत्री नाईकांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना सकाळी सकाळी फक्त इडली खायला बोलावलं... वाचा किस्सा

ते आले आणि त्यांच्यासोबत भास्कर दानवेही आले. त्यांनी यावेळी आपण बसलं पाहिजे, असे म्हटले. पण नुसते बसून काही होणार नाही. दोन महिन्यात कुठलाही निर्णय झाला नाही, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी काहीच निर्णय होत नाहीये. त्यामुळे आता थांबणे शक्य नाही, आम्ही स्वतंत्र तयारी सुरू केली असल्याचे अर्जुन खोतकर म्हणाले. युती झाली नाही, तर याचा फटका मात्र दोन्ही पक्षांना बसेल, असेही खोतकर यांनी स्पष्ट केले. युती तुटल्याचे पाप आमच्या डोक्यावर नको म्हणून आम्ही वाट पहात होतो. आता युती झाली नाही तर ते पाप भाजपच्या माथी असेल, असेही खोतकर यांनी सांगून टाकले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com