Jalna Assembly Constituency : जालना शहराला वेगळ्या उंचीवर नेण्याचा माझा संकल्प!

Arjun Khotkar's promise to take Jalna city to a different height : जालना मतदारसंघाचा आमदार असताना मी रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, रोजगार आणि वीज प्रत्येक गाव आणि शहरात आधुनिक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी, प्रभावी योजनांची अंमलबजावणी केली.
Arjun Khotkar Shivsena News
Arjun Khotkar Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या पाच वर्षात थांबलेली विकास कामे आता महायुतीच्या सरकारमुळे पुन्हा वेगाने सुरू झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रचंड निधी जालन्यासाठी येत आहे. भविष्यात जालना शहर आणि मतदारंसघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा माझा संकल्प असल्याचे जालना मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अर्जून खोतकर यांनी सांगितले.

शहराच्या विविध भागात सुरु असलेल्या प्रचार सभामंधून खोतकर मतदारांना आवाहन करत आहेत. जालना (Jalna) विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरता मी तत्पर आहे. आतापर्यंत गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी आणला. त्यातून आपण विविध विकास कामे सुरू केलेली आहेत.

पुढील काळात आणखीही निधी आणून जालना शहर व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करून जालना शहराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे माझे ध्येय आहे. (Shivsena) जालना मतदारसंघाचा आमदार असताना मी रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, रोजगार आणि वीज प्रत्येक गाव आणि शहरात आधुनिक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी, प्रभावी योजनांची अंमलबजावणी केली.

Arjun Khotkar Shivsena News
Jalna Assembly Constituency : गुंडगिरी, दडपशाही कोण करतो ? हे जालनेकरांना ठाऊक! माझा परिवार माळकरी..

यामुळेच मला मतदारसंघातील जनतेचे प्रेम व आशीर्वाद लाभले! भविष्यात जालना मतदारसंघास समृद्ध आणि संपन्न बनविण्यासाठी मी विकास आराखडा बनविला आहे. पाच वर्षात थांबलेल्या विकासाची पोकळी भरून काढायची व जालना मतदारसंघास पुन्हा एकदा विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.

जालना विधानसभा मतदारसंघाचा भूमिपुत्र म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत रुजू आहे व कुठल्याही अडीअडचणी सुख: दुःखात तुमच्या पाठीमागे तत्परतेने उभा असल्याची ग्वाही, अर्जून खोतकर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com