Tanaji Sawant News : पालकमंत्री शिवसेनेचे, निधीची उधळण भाजपवर ; स्थगिती देत मुख्यमंत्र्यांचा झटका..

Shivsena : सावंत यांची कार्यपद्धती ही नेहमीच वादग्रस्त आणि `हम करे सो कायदा`, अशी राहिली आहे.
Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama

Parbhani : एकीकडे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आपल्यासोबत आलेल्या आणि न आलेल्या देखील राष्ट्रवादीच्या आमदारांना कोट्यावधींचा निधी देऊन खूष करत आहेत.(Tanaji Sawant News) तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री, पालकमंत्री मात्र आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निधी न देता इतर पक्षांवर उधळण करतांना दिसत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री डाॅ.तानाजी सावंत यांच्याबाबतीत हा प्रकार समोर आला आहे.

Tanaji Sawant News
High Court News : कंपनीच्या दूषित पाण्याने पंधरा एकर फळबाग नापीक, शेतकऱ्याची खंडपीठात धाव..

परभणीचे शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. (Shivsena) जिल्हा नियोजन समितीच्या वतीने २०२३-२४ वर्षासाठी जो निधी वाटप करण्यात आला आहे, तो भाजप व इतर पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. (Tanaji Sawant) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या एकाही कामाचा समावेश यात करण्यात आलेला नाही, असा आरोप देशमुख यांनी केला.

यानंतर संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री सावंत यांनी मंजुर केलेल्या कामाला स्थगिती देत दणका दिला. (Parbhani) तानाजी सावंत यांची कार्यपद्धती ही नेहमीच वादग्रस्त आणि `हम करे सो कायदा`, अशी राहिली आहे. अशीच तक्रार यापुर्वी धाराशीव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील केली होती. त्यानंतर परभणीत देखील असाच प्रकार समोर आला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी डावलत सावंत यांनी भाजप व इतर पक्षांना निधीचे वाटप केले. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी हा असंतोष मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी सावंत यांनी मंजूर केलेली कामांची व निधी वाटपाची यादीच रद्द करून टाकली.

परभणी शहरासह जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी ५५ कोटी ६४ लाखाचा निधी डीपीडीसीने मंजूर केला. पण या निधी वाटपात शिवसेनेच्या शिंदे गटाने केलेल्या एकाही शिफारशीचा समावेश पालकमंत्र्यांनी केला नाही. उलट भाजप व इतरांना झुकते माप दिले. शिवसैनिकांवर हा अन्याय असल्याची संतप्त प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com