
Mumbai News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला आहे. हा गुन्हा दाखल होताच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अॅक्शन मोडवर आलं आहे.
संतोष देशमुख यांची मारेकऱ्यांनी हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. ही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रकाराची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली आहे.
बीडमधील (BEED) खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठपुरावा केला. या घटनेचं गंभीर्य आयोगाच्या लक्षात आणून दिलं. आयोगानं गांभीर्य लक्षात घेत, 33/13/5/2025 अन्वये गुन्हा दाखल करून घेतला.
संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली. या हत्येच्या पडसादानं राज्यात उमटत आहेत. राज्यातील काही भागात जनआक्रोश मोर्चा काढले जात आहे. या हत्येमुळे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्याची टोळी केंद्रस्थानी आली आहे. या टोळीवर विविध आरोप होत आहेत. या हत्येत आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात अटक आहे. हत्येशी निगडीत असलेल्या एका फराराचा तपास केला जात आहे.
बीड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या हत्येच्या गुन्ह्यात बीड पोलिस, 'CID', 'SID' तपास करत आहेत. परंतु संतोष देशमुख हत्येत आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल होताच बीड पोलिस, 'CID', 'SID'कडून निसटलेल्या गंभीर मुद्यावर काम देखील सुरू केलं आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. या मुद्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 'अॅक्शन मोड'वर काम करत असून, मारेकऱ्यांना ते अधिकच भोवणार आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग बीड जिल्ह्यामध्ये कारवाईसाठी तातडीने टीम पाठवणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं हे पथक दिल्लीचं असणार आहे. हे पथक हत्येचा संपूर्ण घटनेचा अहवाल मागवणार आहे. हत्येच्या तपासात पोलिसांचं, 'CID','SID', दुर्लक्ष झालं असल्यास हे पथक त्याचा अहवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे स्वतंत्रपणे सादर करेल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकार असल्याने यात कारवाई देखील करू शकतं. त्यामुळे बीडमध्ये येणाऱ्या आयोगाच्या पथकाची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.