
Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचे एक दिवसीय अधिवेशन रविवारी (ता. 12) शिर्डीत होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा अन् केंद्रीय मंत्री अमित शाह या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या 15 हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनाचे प्रमुख दोन मुद्दे केंद्रस्थानी असणार आहेत. भाजपची संघटनात्मक बांधणी आणि राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचे मंथन!
शिर्डीत (Shirdi) 12 जानेवारीला होत असलेल्या भाजपच्या एक दिवसीय अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे. पुणे इथं झालेल्या अधिवेशन विधानसभा निवडणुकीपूर्वी झालं होतं. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकांचं टार्गेट देण्यात आलं होतं. यामुळं विधानसभा निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळालं.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजप (BJP) आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका पक्षाचा पाया अधिक मजबुत करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपकडून स्वबळाची चाचपणी होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत आणि संघटनात्मक विस्ताराबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा कल नेमका कोणत्या दिशेनं आहे, याची चाचपणी भाजपचे वरिष्ठ नेते करणार आहेत.
राज्यात पूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपने पहिला क्रमांक पटकवला होता. तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपची सध्या सदस्य नोंदणी सुरू आहे. एका विधानसभा मतदारसंघात तब्बल 80 ते 90 हजार सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. हे कितपत सफल होते, हे पुढं कळेलच. यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यातून भाजप पक्ष संघटनेची बांधणी जोमानं करत आहे, हे दिसतं.
- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी भाजप रणशिंग फुंकणार
- भाजपच्या महाविजय 3.0 अभियानास उद्यापासून होणार सुरवात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठ घेणार
- दुसरी बैठक मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप आमदार अन् मंत्र्यांसोबत होणार
- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरवात करतील
- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा निवडणुकीसाठी मार्गदर्शन करतील
- पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाने होईल
- दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील
- अधिवेशनाचा समारोप हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने होईल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.