Amar Kale On Dhananjay Munde : शरद पवारांच्या खासदारानं मंत्री मुंडेंबाबत मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी; अजितदादांची केली कोंडी?

Walmik Karad Beed Sarpanch Santosh Deshmukh murder CID Wardha MP Amar Kale Minister Dhananjay Munde CM Devendra Fadnavis : वाल्मिक कराड याने सरेंडर करताच एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळेंनी मंत्री धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली.
Amar Kale
Amar KaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : वाल्मिक कराड याने पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर करताच, बीडच्या गुन्हेगारीवरून राज्यात वादळ उठले. यात वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने त्याची झळ त्यांना देखील बसू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धाचे खासदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खासदार काळे यांच्या मागणीमुळे अजित पवारांची कोंडी झाली आहे.

खासदार अमर काळे म्हणाले, "बीडमधील (BEED) गुन्हेगारीमुळे या जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रात बिहार म्हणून करून दिली जात आहे. अतिशय क्रूर पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्येतील प्रमुख आरोपींचे, मास्टरमाईंडचे नाव समोर आले पाहिजे". नुसत्या सरेंडरने हा प्रश्न सुटणार नाही. राज्य सरकारने या गंभीर मुद्यात पूर्ण लक्ष घालावे, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.

Amar Kale
Walmik Karad Surrender News : वाल्मिक कराड सरेंडर होताच, मुख्यमंत्री फडणवीसांचा कोणाला फोन? धनंजय देशमुखांना कशाची वाटते भीती!

"बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक आज दहशतीमध्ये आहे. बीड जिल्हा गुन्हेगारीच्या (Crime) दहशतीतून मुक्त करण्याची नितांत गरज आहे. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढून, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था कशी व्यवस्थित, पूर्व पदावर आणता येईल, याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे", असेही खासदार अमर काळे यांनी म्हटले.

Amar Kale
Walmik Karad Surrender News : 'ती' कोणती मोठी ताकद संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना वाचवते आहे? खासदास सुळे म्हणाल्या, 'तर समाधान...'

बीड जिल्हा दहशतमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी ठोस कारवाई करावी. सरेंडर झालेले वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे तिथं गाजत असलेल्या गुन्ह्यांची निष्पन्नपण चौकशी, उलगडा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली.

अमर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अजितदादांची कोंडी केली आहे. खासदार काळे यांनी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केल्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Raosaheb Danve takes a political jibe at Kalyan Kale and Bhaskar Ambekar over the Jalna-Pune railway
Shivsena Abdul Sattar
Sandipan Bhumre Kalyan Kale Prashant Bamb Ambadas Danve .jpg
Kiran Kale Shisena UBT
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com