Asaduddin Owasi News : लोकसभा आम्ही पुन्हा लढणार आणि जिंकणार..

Chhatrapati Sambhajinagar : राज्यात आम्ही नव्या मित्राच्या शोधात आहोत, आमच्याशी मैत्री करण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत.
Asaduddin Owasi News
Asaduddin Owasi News Sarkarnama

Aimim : औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएम पुन्हा लढणार आणि जिंकणार असा दावा खासदार असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owasi News) यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी माध्यमांशी ओवेसी बोलत होते. शहराच्या नामांतरावर मी नाही, तर इम्तियाज जलील बोलतील असे सागंत त्यांनी शहराचा उल्लेख औरंगाबाद असाच केला.

Asaduddin Owasi News
Asaduddin Owasi On Modi : मोदी सर्वात मोठे एक्टर, त्यांनी सगळ्यांची सुट्टी केली असती..

आमचा पक्ष केवळ (Aurangabad) औरंगाबादच नाही, तर देशाच्या विविध राज्यांमध्ये लोकसभा लढवणार आहे. औरंगाबादची जागा आम्ही जिंकलो होतो, आता पुन्हा इथे लढणार आणि जिंकणार. (Aimim) महाराष्ट्रात आणखी कुठल्या लोकसभा मतदारसंघातून लढायचे याचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज हे घेतील. तेच राज्याचे मेन एक्टर आहेत. मी तर पाहुणा कलाकार असल्याची मिश्किल टप्पणी देखील ओवेसी यांनी केली.

राज्यात आम्ही नव्या मित्राच्या शोधात आहोत, आमच्याशी मैत्री करण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. लवकरच आमच्यासोबत नवा मित्र असले. कर्नाटकच्या निवडणुकीत पीएफआय-बजरंग दलावर बंदीच्या मागणीनंतर वातावरण तापले, (Pm Modi) पंतप्रधान मोदींनी `बजरंग बली की जय`, अशा घोषणा दिल्या याकडे ओवेसींचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, हे काॅंग्रेस आणि मोदींना विचारले पाहिजे.

काॅंग्रेस ही एक नाटक कंपनी आहे, आधी बजरंग दलावर बंदीची भाषा केली आणि नंतर त्यांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कर्नाटकात म्हणतो, आम्ही मंदिर बांधू. यांना विचारधाराच राहिलेली नाही. मोदी हे संविधानामुळे त्या पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी जय हिंदचा नारा देणे अपेक्षित आहे. मी जर म्हणालो असतो अल्ला हो अकबर, तर तुम्ही माझ्या मागे लागला असतात. पण मोदींनी बजरंग बली की जय म्हटलं तरी सगळा मिडिया गप्प आहे? असा टोला देखील ओवेसी यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com