Asaduddin Owaisi : ओवेसींची 'इंडिया' आघाडीला कोणती ऑफर? पंतप्रधानांबाबत ओवेसींचं महत्त्वाचं विधान, म्हणाले...

INDIA Alliance : एकनाथ शिंदेंना संविधान चालवायचे आहे की बुलडोझर? ओवेसींचा सवाल
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar Political News :

AIMIM चे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी नेहमी भाजपला लक्ष्य करतात. संसदेत आणि बाहेरही ते पंतप्रधानांवर कठोर टीका करताना दिसतात. आताही त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना एक महत्त्वाची बाब समोर आणली आहे. त्यांनी 'इंडिया' आघाडीला ऑफर दिल्याचे छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

या वेळी असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर ऊहापोह करत भाजप, पंतप्रधान मोदी, दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Asaduddin Owaisi
Prakash Ambedkar Vs Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात!

MIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना 'इंडिया' आघाडीचे (INDIA Alliance) वेध लागले आहेत. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार नाहीत, यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रित होऊन निर्णय घेणार आहोत. त्यासाठी आम्हीच 'इंडिया' आघाडीला ऑफर दिल्याचे ओवेसींनी विधान केले आहे. त्याचवेळी देशाच्या पंतप्रधानावर आता विश्वास राहिला नाही, असेही ओवेसी म्हणालेत. त्यामुळे 'इंडिया' आघाडीत खरोखरच MIM स्थान मिळणार का, याची सर्वांना उत्कंठा आहे.

त्याचवेळी गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (Bahuhan Vanchit Aaghadi) आणि 'एमआयएम' यांची लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) झालेली आघाडी विधानसभा निवडणुकीपूर्वी तुटली होती, याचीही आठवण जागवली जाते. कारण 'वंचित'चा महाविकास आघाडीत समावेश झालेला असला तरी अजून 'इंडिया' आघाडीत समावेश झालेला नाही, याकडे लक्ष वेधले जाते.

एमआयएमवर टीका अन् भाजपला साथ

अशोक चव्हाणांवर टीका करताना MIM ला नावे ठेवणारे आता भाजपसोबत जात आहेत, अशी टीका या वेळी ओवेसी यांनी केली. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला साथ देत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले होते. त्याच वेळी लोकशाही संपली, अशी टीका MIM ने केली होती. याकडे ओवेसींनी पुन्हा लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वामिनाथन आयोग लागू करा

दरम्यान, दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, अशी त्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांची ही मागणी योग्य असून सरकारने त्याची पूर्ती केली पाहिजे, अशी मागणी असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

या वेळी त्यांनी नरेंद्र मोदींचाही (Narendra Modi) समाचार घेतला. अबुधाबीमध्ये त्यांनी टेलिप्रिंटर पाहून अरबी भाषेत संवाद साधला, यात नवल काहीच नाही, अशी टीकी त्यांनी केली.

इम्तियाज जलील मुंबईतून...

राज्य सरकारने मीरा भाईंदरमध्ये बुलडोझरने घरे पाडून अनेक कुटुंबांना बेघर केले आहे. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी इम्तियाज जलील यांनी मुंबईतून निवडणूक लढवण्याविषयी पक्ष विचार करत आहे, असेही ओवेसी म्हणाले. त्याचवेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना संविधान चालवायचे आहे, की बुलडोझर चालवायचा आहे? असा सवालही असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

(Edited by Avinash Chandane)

R

Asaduddin Owaisi
Nanded BJP News : अशोक चव्हाणांना भाजपने स्वीकारले, चिखलीकर मनाने स्वीकारणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com