Prakash Ambedkar Vs Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात!

Maharashtra Elections 2024 : महाविकास आघाडीत वंचितच्या प्रवेशासाठी अशोक चव्हाणांनीच लावला होता जोर, मात्र आता...
Prakash Ambedkar Vs Ashok Chavan
Prakash Ambedkar Vs Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Mahavikas Agahadi : भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या 48 तास आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळावे यासाठी चव्हाण यांनी आपली शक्तीपणाला लावली होती. मोठे प्रयत्न आणि विरोधानंतर आंबेडकरांची वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनली. पण आता ज्या अशोक चव्हाणांनी हा घाट घातला तेच भाजपामध्ये जाऊन बसले आहेत.

महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेचा भाग असलेल्या अशोक चव्हाण(Ashok Chavan ) यांच्या भाजपामध्ये जाण्याने महाविकास आघाडीला आता नव्याने आपली निवडणूक रणनिती आखावी लागणार आहे. यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अशोक चव्हाण भाजपाकडून राज्यसभेवर गेल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात ते नसणार आहेत. पण नांदेड आणि मराठवाड्यात आपला प्रभाव दाखवून ते भाजपाला येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar Vs Ashok Chavan
Loksabha Parbhani Constituency : महायुतीचे कार्यकर्ते पेचात, कोणता झेंडा घेऊ हाती

त्यांच्या या मार्गात प्रकाश आंबेडकर मोठा अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आणि एमआयएमच्या युतीने अशोक चव्हाणांची खासदारकी हिसकावून घेतली होती. भाजपासोबत गेल्याने अशोक चव्हाण प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव असलेल्या राज्यातील विविध मतदारसंघात जाऊन त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण त्याआधीच प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यातील वर्चस्वाला धक्का लावून त्यांचा करेक्ट कार्यक्रम आखला असल्याचे बोलले जाते.

अशोक चव्हाण भाजपाकडून(bjp) राज्यसभेवर गेल्यानंतर त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्या श्रीजया राजकारणात पदार्पण करू पाहत आहे. या मतदारसंघातूनच प्रकाश आंबेडकर आपल्या अशोक चव्हाण विरोधातील मोहिमेला सुरुवात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भोकर मतदारसंघावर अशोक चव्हाण यांची मजबुत पकड आहे. आता सोबतीला भाजपाची ताकदही त्यांना असणार आहे, त्यामुळे भोकरमध्ये चव्हाणांना रोखणे अवघड जाणार असले तरी जिल्ह्यातील इतर मतदारसंघ आणि मराठवाड्यात प्रकाश आंबेडकर चव्हाणाच्या प्रभावाला रोखण्याचे प्रयत्न करु शकतात.

Prakash Ambedkar Vs Ashok Chavan
Nanded BJP News : अशोक चव्हाणांना भाजपने स्वीकारले, चिखलीकर मनाने स्वीकारणार का?

प्रकाश आंबेडकर आणि अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय वैर तसे खूप जुने आहे. अशोक चव्हाण यांनी वयाच्या तिसाव्या वर्षांत लोकसभा गाठली ती प्रकाश आंबेडकर‌ यांना 1987च्या पोटनिवडणुकीत पराभूत करून. हा पराभव प्रकाश आंबेडकर‌ यांच्या जिव्हारी लागला होता. याचा वचपा आंबेडकरांकडून 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काढण्यात आला. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा जनता दलाचे डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी पराभव केला होता. या पराभवात प्रकाश आंबेडकर‌ यांच्या समर्थकांनी महत्वाची भूमिका बजावली होती असे बोलले जाते.

Prakash Ambedkar Vs Ashok Chavan
Nanded Politics : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे 'एमआयएम'च्या पतंगाला नांदेडमध्ये हवा ?

नांदेड जिल्ह्यात दलितांच्या मतांची टक्केवारी लक्षणीय आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडी व एमआयएमची आघाडी होती. या आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांना तब्बल एक लाख 62 हजार मते मिळाली होती. या मत विभाजनामुळे अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या पारंपारिक मतांमध्ये दलित मतांचा समावेश होतो. नांदेड शहर व जिल्ह्यात ही मते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सोबत राहिली आहेत.

मात्र आता चव्हाण यांनी भाजपात उडी मारल्यामुळे हा मतदार चव्हाण यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका प्रकारे वंचितला संधीच उपलब्ध होणार आहे. आता प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी या संधीच सोनं कसं करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आह. महाविकास आघाडीत वंचितला आणण्यसाठी अशोक चव्हाण यांनी जरी प्रयत्न केले असले, तरी त्यांचे व अशोक चव्हाण यांचे कधी जमलेच नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com