Ashok Chavan : भाजपचा अशोक चव्हाणांवर डोळा, पण ते काही टाळी देईनात..

Bjp : चव्हाणांसाठी भाजपकडून गळ टाकण्यात आला आहे. चव्हाण मात्र त्यात काही अडकत नाहीयेत.
Ashok Chavan News, Aurangabad
Ashok Chavan News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : गेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीपासून काॅंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील नेत्यांच्या फोडाफोडीचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे. मुळ (Bjp) भाजपपेक्षा इतर पक्षातून आलेल्यांचीच गर्दी पक्षात अधिक होत आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र त्याकडे फारसे लक्ष न देता भाजपची मोहिम सुरूच आहे.

Ashok Chavan News, Aurangabad
Ambadas Danve News : दानवेंनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ..

काॅंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर सध्या भाजपचा डोळा आहे. चव्हाणांच्या भाजप प्रेवशाच्या चर्चा अनेकवेळा झाल्या, पण तो प्रवेश प्रत्यक्षात काही अजून झालेला नाही. अशोक चव्हाणांकडून मी भाजपमध्ये जाणार नाही, माझ्या प्रवेशाच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत, हे सांगून सांगून ते देखील थकले आहेत.

परंतु आता कधीकाळी चव्हाणांसोबत सभागृहात आणि सरकारमध्ये एकत्र काम करणाऱ्या पण आता भाजपमध्ये मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांना पक्षप्रेवशाची आॅफर दिल्याने नव्याने या चर्चेला सुरूवात झाली आहे. काॅंग्रेसमध्ये काही राहिलेले नाही, तेव्हा अशोक चव्हाणांनी आता विचार करावा, देशाने मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे, तुम्ही देखील स्वीकारा, अशी साद विखेंनी चव्हाणांना घातली आहे.

काॅंग्रेस पक्षातील अंतर्गत वाद नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला होता. थोरात-तांबेंनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांची हायकंमाडकडे तक्रार केली होती. आता सारवासारव करून सगळं काही अलबेल असल्याचे चित्र काॅंग्रेसकडून निर्माण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चव्हाणांसाठी भाजपकडून गळ टाकण्यात आला आहे. चव्हाण मात्र त्यात काही अडकत नाहीयेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिनाभरापुर्वी औरंगाबादेत बोलतांना भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार आहेत, अशी नावे समोर येतील की सगळ्यांना धक्का बसेल, असा दावा माध्यमांशी बोलतांना केला होता. मात्र अजून काही असे धक्के जाणवले नाहीत. अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता उत्तर द्यायचे नाही, अशी भूमिका घेतली आहे.

Ashok Chavan News, Aurangabad
Amit Deshmukh : सांस्कृतिक शहर म्हणून लातूरचा उल्लेख, मला वाटलं नागपूर म्हणाल ; अभिमन्यू पवारांना टोला..

त्यामुळे विखेंच्या आॅफरला चव्हाण टाळी देण्याची शक्यता तशी कमीच आहे. अशोक चव्हाण २००८ ते नोव्हेंबर २०१० या काळात सलग दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली होती. याशिवाय त्यांनी सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्रीपद भुषवलेले आहे. मराठवाड्यातील एक मातब्बर नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com