Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar : अशोक चव्हाण यांच्याकडून चिखलीकरांची विकेट! मटका किंग अन्वर खानला चोवीस तासात राष्ट्रवादीतून काढले!

Following sharp criticism from Ashok Chavan, the NCP expelled the alleged Matka king. This political shake-up has put Pratap Patil Chikhlikar on the backfoot. : स्थानिक नेतृत्वाने अजित पवारांना अंधारात ठेवून चुकीच्या लोकांना पक्ष प्रवेश दिला असल्याचे सांगत चिखलीकरांची कोंडी गेली होती.
Ashok Chavan-Pratap Chikhlikar  News Nanded
Ashok Chavan-Pratap Chikhlikar News NandedSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यात एक नंबवर नेण्यासाठीच्या स्पर्धेत प्रताप पाटील चिखलीकर यांनी आघाडी घेतली आहे. दर महिन्याला अजित पवारांना जिल्ह्यात बोलावून मोठ्या नेत्यांचे प्रवेश सोहळे होत असल्याने चिखलीकरांची जिल्ह्यात काॅलर टाईट झाली. मात्र सुसाट निघालेल्या चिखलकरांनी एक चूक केली आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अशोक चव्हाण यांनी त्यांची विकेट काढली.

अन्वर अली खान यांना प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला होता. स्थानिक पातळीवर हा प्रवेश करून घेण्यात आला होता. मात्र या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका मटका किंग आणि मकोका सारखे गुन्हे प्रस्तावित असणाऱ्या गुन्हेगाराला प्रवेश कसा दिला? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती. विशेष म्हणजे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी या विषयावर भाष्य करत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर निशाणा साधला होता.

स्थानिक नेतृत्वाने अजित पवारांना अंधारात ठेवून चुकीच्या लोकांना पक्ष प्रवेश दिला असल्याचे सांगत चिखलीकरांची कोंडी गेली होती. अजित पवारांना मी दोष देत नाही असे सांगत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी चिखलीकर चुकीच्या लोकांना पक्षात प्रवेश देत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुत्रे हलली आणि चोवीस तासाच्या आतच मटका किंग अन्वर अली खान यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका वृत्तवाहिनाला प्रतिक्रिया देताना आपली चुक झाल्याची कबुली देखील दिली आहे.

Ashok Chavan-Pratap Chikhlikar  News Nanded
Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar : अशोक चव्हाणांनी संधी हेरली, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याला राष्ट्रवादीत प्रवेश देताच चिखलीकरांना खिंडीत गाठले!

अन्वर अली खान हा नांदेड शहरातील मटका किंग, गुंड म्हणून ओळखला जातो. काल चिखलीकर यांच्या उपस्थितीत त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता. चिखलीकर यांच्या निवासस्थानी हा प्रवेश झाला होता. अन्वर अली खान याच्यावर मारहाण, बळजबरी जमिनीवर कब्जा करणे, बेकादेशीर शस्त्र बागळणे, हवेत गोळीबार, बायो डीझेल विकल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मटका किंग म्हणून तो जिल्ह्यात ओळखला जातो. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला पक्षात प्रवेश कसा दिला? असा सवाल केला जात होता.

Ashok Chavan-Pratap Chikhlikar  News Nanded
Beed political BJP And NCP : अजितदादांच्या बीड दौऱ्यात मोठी घडामोड; कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे...

त्यानंतर आज चिखलीकरांनी आपली चूक झाल्याचे मान्य करत अन्वर अली खान याला पक्षातून काढून टाकल्याचे सांगत चूक दुरूस्त केल्याचे म्हटले आहे. या एका चुकीची मोठी किंमत चिखलीकर यांना भविष्यात चुकवावी लागू शकते. अशोक चव्हाण या आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याच्या शर्यतीत चिखलीकरांनी एक चुकीचे पाऊल टाकताच अनुभवी अशोक चव्हाण यांनी त्यांची विकेट काढल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com