Ashok Chavan News: अशोक चव्हाणांचा लाडका उमेदवार इतिहास घडवणार; 36 वर्षानंतर पहिल्यांदाच 'स्थानिक'च्या नांदेड मतदारसंघात कमळ फुलणार ?

Nanded MLC Election News: माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात 36 वर्षानंतर पहिल्यांदाच कमळ फुलण्याची शक्यता आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

MLC Election 2026 : माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात 36 वर्षानंतर पहिल्यांदाच कमळ फुलण्याची शक्यता आहे. तीन महिन्यापूर्वी नांदेड-वाघाळा महापालिकेत भाजपाची बहुमतासह सत्ता आली. तिथेही पहिल्यांदा भाजपाचे कमळ फुलवण्यात अशोक चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता.

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि गेल्या 36 वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा आहे. 1986 ते 2022 पर्यंतच्या काळात या मतदारसंघावर काँग्रेसचे पूर्णपणे वर्चस्व होते. याच पक्षाच्या तीन प्रमुख नेत्यांनीच इथे प्रत्येकी एक तप असे प्रतिनिधित्व केले आहे.

दिवंगत किशनराव राठोड सलग दोन टर्म या मतदारसंघातून विधान परिषदेवर गेले होते. 1998 - 2010 मध्ये कमलकिशोर कदम यांचाही राजकीय मार्ग याच मतदारसंघातून झाला. त्यांनीही एक तप या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तर 2010- 2016 दरम्यान, काँग्रेसचेच अमरनाथ राजूरकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आणि भाजपने निवडणूक न लढवल्यामुळे अमरनाथ राजूरकर हे पहिल्यांदा बिनविरोध निवडून आले होते.

2016 ते 2022 अमरनाथ राजूरकर हे दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले होते. अशोक चव्हाण यांची सावली असा त्यांचा उल्लेख जिल्ह्याच्या राजकारणात केला जातो. 23 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण 472 मतदारांपैकी अमरनाथ राजूरकर यांना 251 मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष शिंदे यांना 208 मते होती.

1986 ते 2022 या काळात किशनराव राठोड, कमलकिशोर कदम आणि अमरनाथ राजूरकर या तिघांनीच काँग्रेस पक्षाकडून प्रत्येकी 12 वर्षे प्रतिनिधित्व करत हा गड काँग्रेसकडे कायम राखला होता. 1992 च्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस विरोधी वातावरण होते. काँग्रेस विरोधात लढलेले मोहन पाटील टाकळीकर यांना त्यावेळी भाजपने मदत केली होती. 2010 मधील निवडणुकीत भाजपने या मतदारसंघातून माघार घेतली होती.

डिसेंबर 2022 मध्ये अमरनाथ राजूरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही प्रलंबित निवडणूक आता होऊ लागली आहे. या मतदारसंघावर भाजपचा प्रभाव वाढला असून महायुतीमध्ये या जागेवरून चुरस पाहायला आहे. सध्या या निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात 432 मतदार पात्र ठरले आहेत. अशोक चव्हाण या निवडणुकीत उमेदवार ठरवणार आहेत. अर्थात त्यांचे लाडके अमरनाथ राजूरकर पुन्हा मैदानात उतरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com