Ashok Chavan : काँग्रेसने अशोक चव्हाणांचा 'कारभार' गुंडाळला; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Nanded Congress News : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारकी आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तेव्हापासूनच जिल्हा कार्यालयात शुकशुकाट
Nanded Congress Office
Nanded Congress OfficeSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : राजकीय आयुष्यातील चार दशके ज्या नांदेडच्या काँग्रेस जिल्हा कार्यालयातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कारभार हाकला. तेच कार्यालय रिकामे करण्याची वेळ त्यांच्यावर आली. नांदेड जिल्हा काँग्रेस कार्यालयात आवराआवर सुरू झाली आहे. कार्यालयात दिमाखाने लावण्यात आलेले अशोक चव्हाण यांचे बॅनरही हटवण्यात आले आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारकी आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तेव्हापासूनच जिल्हा कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.

आज या कार्यालयात अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थक आमदार, आजी-माजी पदाधिकारी व काँग्रेसशी संबंधित आठवणींचा ठेवा गुंडाळून ते रिकामे करण्यात आले. मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आज भाजपवासी झाले. नांदेड या आपल्या कर्मभूमीतून त्यांनी काँग्रेसमधील आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांच्या या प्रवासाचे साक्षीदार ठरलेले शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालय आता ओस पडले आहे.

Nanded Congress Office
Ashok Chavan : मोदी, चव्हाण अन् अजितदादा...; चेन्नीथलांनी सगळ्यांचाच हिशेब चुकता केला

अनेक विजय, पराभव, गुलालांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अनुभवलेले हे पक्ष कार्यालय आज रिकामे झाले. अशोक चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेसची कल्पनाच त्यांच्या समर्थकांना करवत नाही. आज जिल्हा काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार? पक्षाला गतवैभव कोण प्राप्त करून देणार? असे असंख्य प्रश्न जिल्हा कार्यालय रिकामे करताना अनेकांच्या मनात होते.

ज्या काँग्रेस (Congress) कार्यालयात परवापर्यंत अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी बैठक घेतल्या. जयंती, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेतले, निवडणुकांची रणनीती आखली, तेच कार्यालय आता ओस पडले आहे. आज चव्हाण समर्थकांनी इथे आवराआवर करत कार्यालयातील सामान गाडीत टाकून नेले.

Nanded Congress Office
Nana Patole On Ashok Chavan : 'भाजपवासी' चव्हाणांना पहिला धक्का देण्यासाठी काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; पटोलेंनी दिले संकेत..

अशोक चव्हाण यांचे लावलेले मोठे बॅनरही काढून घेण्यात आले. आता या कार्यालयात कोण बसणार? महाविकास आघाडीच्या मिशन लोकसभेचे काय होणार? अशा प्रश्नांनी प्रत्येकाच्या मनात गोंधळ घातला आहे. नवा मोंढा परिसरातील जिल्हा कार्यालयाचे हे उदासवाने रूप पाहून विरोधकही क्षणभर थबकत आहेत. या कार्यालयाने काँग्रेसच्या वैभवाचे दिवस पाहिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, बाजार समिती अशा विविध निवडणुकांची रणनीती याच कार्यालयातून आखली गेली. पक्षाच्या बैठका, मेळावे आणि त्यानिमित्ताने नांदेडमधील सर्वाधिक काळ अशोक यांनी याच कार्यालयात घालवला. त्यांच्याच शिफारशीने नियुक्त्या, उमेदवाऱ्या इथून जाहीर केल्या जायच्या. पण अशोक चव्हाण यांच्या एका निर्णयाने सगळे चित्रच बदलले आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता पक्षात कोणते स्थानिक नेते, पदाधिकारी राहतात? ते काँग्रेसला पुन्हा उभारी देऊन पुनश्च हरि ओम करण्यात यशस्वी ठरतात का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

(Edited by Sunil Dhumal)

R

Nanded Congress Office
Lok Sabha Election 2024 : लातूरसाठी महायुतीत स्पर्धा; तर काँग्रेसकडे उमेदवाराची वानवा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com