Ashok Chavan : महाराष्ट्रात इतक्या खालच्या स्तराचे राजकारण यापुर्वी कधी झाले नाही

केंद्रीय तपास यंत्रणांचा होणार थेट हस्तक्षेप आणि केली जाणारी कारवाई आश्चर्यकारक आहे. या राज्यात यापुर्वी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधी झाले नाही. (Minister Ashok Chavan)
PWD Minister Ashok Chavan
PWD Minister Ashok ChavanSarkarnama

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांना ईडीने अटक केली आहे. (Nawab Malik) अंडरवल्ड डाॅन दाऊद इब्राहीमच्या मनी लाॅड्रींग प्रकरणी ही करावाई केल्याचे बोलले जाते. (ED Action) या कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री चांगलेच संतापले आहे. (Ashok Chavan) राज्यात इतक्या खालच्या स्तराचे राजकारण कधीच झाले नव्हते, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कारवाईवर भाष्य केले.

नगरपालिका, महापालिका निवडणुकीच्या स्तरावर केले जाते, त्यापेक्षाही खालची पातळी गाठण्यात आली आहे, असेही चव्हाण म्हणाले. ईडीने आज सकाळी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. आठ तास चौकशी केल्यानंतर दुपारी ईडीने त्यांना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता.

मलिक यांनी भाजपला अंगावर घेत सगळ्याच नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मलिक यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. या आरोप-प्रत्यारोपानंतर आता ईडीने नवाब मलिक यांच्या विरोधात फास आवळल्याचे दिसून येत आहे. ईडीच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस आक्रमक झाली असून ईडीच्या कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजीही केली. दरम्यान, मलिक यांना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून देखील वेगवेगळ्या हालचालींना सुरूवात झाली आहे.

PWD Minister Ashok Chavan
सोमय्या म्हणाले; आता मलिकांनंतर अनिल परबांचा नंबर...

या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले, लोकशाहीत एकमेकांना विरोध, आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पोलीस स्टेशन, न्यायालये आहेत, मात्र या सगळ्यांना डावलून केंद्रीय तपास यंत्रणांचा होणार थेट हस्तक्षेप आणि केली जाणारी कारवाई आश्चर्यकारक आहे. या राज्यात यापुर्वी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधी झाले नाही. नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकीत गावांत, शहरात ज्या प्रकारचे राजकारण चालते, त्यापेक्षाही खालची पातळी केंद्रीय तपास यंत्रणा आणि देशातील सत्ताधाऱ्यांनी गाठली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com