मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम मनी लॉन्डींग प्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरावर आज (ता. 23 फेब्रुवारी) ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यानंतर मलिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. मलिकांवरील कारवाईवरून महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेते आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगायला सुरूवात झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे सरकारवर पुन्हा टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर लागणार, असे सुचक ट्वीट करत सोमय्यांनी इशारा दिला आहे.
सोमय्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "अनिल देशमुख यांच्या नंतर नवाब मलिक आणि आता अनिल परब उद्धव ठाकरे सरकारमधील सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल", असे ट्वीट सोमय्यांनी केले आहे. याबरोबरच ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे केले आहेत. पण आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. राज्यात ज्या-ज्या मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत, त्यांचे घोटाळे आम्ही बाहेर काढणार आणि महाराष्ट्रला घोटाळेमुक्त करणार, असे सोमय्या म्हणाले. सोमय्यांच्या या दाव्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, चौकशीनंतर ईडीने मलिकांवर अटकेची कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आले आहे. मात्र, मलिकांच्या अटकेमुळे राज्यभरातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. चौकशीनंतर मलिकांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर पडल्यावर यांच्या चेहऱ्यावर हसू होते तर, त्यांनी हात उंचावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. तसेच प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिक्रिया देताना झुकेंगे नहीं, असे म्हटले आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मलिकांंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणीही करून टाकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.