Sandipan Bhumre News : भुमरेंना मुलासाठी मतदारसंघ सोडायचा ? म्हणून लोकसभेवर दावा..

Shivsena : भाजपने या सगळ्याच मतदारसंघावर दावा सांगायला सुरूवात केल्याने शिंदे गटाचे खासदार भयभीत झालेले आहेत.
Minister Sandipan Bhumre- Son Vilas Bhumre News, Aurangabad
Minister Sandipan Bhumre- Son Vilas Bhumre News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : औरंगाबाद लोकसभेची जागा भाजप लढवणार? की मग शिंदे गट यावर सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेमागचे कारण म्हणजे एकीकडे भाजपने शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात जोर लावला आहे. अगदी दोन महिन्यापुर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी शहरात सभा घेवून चाचपणी देखील केली.

Minister Sandipan Bhumre- Son Vilas Bhumre News, Aurangabad
Khaire-Jadhav News : पाठिंबा जाहीर केल्यानंतर खैरे-जाधव पावणेचार वर्षांनी आले एकत्र...

भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) हे लोकसभा लढवण्यास इच्छूक आहे. (Shivsena) तर दुसरीकडे राज्याच्या सत्तेत भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगायला सुरूवात केली आहे.

अर्थात भुमरे यांची ही सुप्त इच्छा देखील आहे, कारण पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आल्यानंतर आता हा सुरक्षित मतदारसंघ त्यांना आपले चिरंजीव विलास भुमरे यांच्यासाठी सोडायचा आहे. विलास भुमरे हे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती होते. सध्या पालकमंत्री भुमरे यांचा बराच भार ते आपल्या खांद्यावर वाहतांना दिसतात.

पैठण मतदारसंघात बापू नावाने प्रसिद्ध असलेल्या विलास यांच्यासाठी वडिल संदीपान भुमरे हे लोकसभा लढायला तयार असल्याचे बोलले जाते.शिंदे गटासोबत गेलेल्या चाळीस आमदारांना निवडणूक आयोगाने स्वतंत्र नाव आणि चिन्ह तात्पुर्त्या स्वरूपात दिले आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आता ४० आमदार आणि १२ खासदारांसह भाजपसोबत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघात कोण लढणार? यावरून कथ्याकूट सुरू आहे.

भाजपने या सगळ्याच मतदारसंघावर दावा सांगायला सुरूवात केल्याने शिंदे गटाचे खासदार भयभीत झालेले आहेत. परंतु शिंदे यांनी त्यांना सध्या या विषयावर गप्प राहायचे, अशा सूचना दिलेल्या आहेत. तरी देखील भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा बाळासाहेबांची शिवसेनाच लढणार आणि आपली तयारी असल्याचे जाहीरपणे सांगयाला सुरूवात केली आहे.

Minister Sandipan Bhumre- Son Vilas Bhumre News, Aurangabad
Imtiaz Jalil : शरद पवारांच्या बाजूला बसण्याची ताकद ठेवतो, जुने दिवस आता गेले..

भुमरे यांच्या या मागणीमागे मुलाला आमदार करण्याची खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे भाजपने मात्र भुमरे यांच्या दाव्याला फारसे महत्व न देता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच औरंगाबाद लोकसभा कोण लढवणार या संदर्भात अंतिम निर्णय घेतील, असे सांगत वेळ मारून नेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com