Ashok Chavan News : भगवा म्हणजे शिवसेना, घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी बाकी सगळी काॅंग्रेस..

Congress : काॅंग्रेसला कसब्यातील विजयाने दहा हत्तीचे बळ आले आहे.
Ashok Chavan News, Nanded
Ashok Chavan News, NandedSarkarnama

Nanded : नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. कसबा पोटनिवडणुकीत तर काॅंग्रेसने इतिहास घडवत भाजपच्या तीस वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावला. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीची ताकद वाढत असल्यामुळे नेते भलतेच खूष आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कार्यक्रमांच्या उदघाटन आणि शुभारंभाच्या वेळी अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी संदर्भात भाष्य केले.

Ashok Chavan News, Nanded
Mp Sanjay Jadhav News : सात जन्मही मी या पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही..

या कार्यक्रमात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा सत्कार करतांना त्यांच्या गळ्यात भगवे उपरणे घालण्यात आले. याचा उल्लेख अशोक चव्हाणांनी आपल्या भाषणात वेगळ्याच पद्धतीने केला. (Nanded) अशोक चव्हाण म्हणाले, गळ्यातला भगवा म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, हातातले घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी आणि बाकी सगळं काॅंग्रेस. चव्हाण यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली.

राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजते आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे, तर कापूस घरात पडून आहे. अशा परिस्थितीत कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला.

या विजयाचे राज्यभरात कौतुक होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्याविरोधात जनतेने कौल दिल्याचा दावा करत महाविकास आघाडी अधिक भक्कम कशी राहील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी पक्षातील घटक असलेल्या काॅंग्रेसला कसब्यातील विजयाने दहा हत्तीचे बळ आले आहे. पण हा विजय शिवसेना-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा आहे, याची जाणीव अशोक चव्हाणांना आहे.

त्यामुळेच भोकर येथील भाषणात त्यांनी महाविकास आघाडीचा आवर्जून उल्लेख केला. चव्हाण भाजपमध्ये जाणार अशा चर्चा अधूनमधून होत असतात. यावर त्यांनी एक प्रकारे महाविकास आघाडीची व्याख्या स्पष्ट करतांना भाष्य केले. शिवसेनेचा भगवा, राष्ट्रवादीचे घड्याळ आणि बाकी सगळी काॅंग्रेस म्हणजे महाविकास आघाडी असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com