Nanded Loksabha Exit Poll : नांदेडमध्ये चव्हाण-चिखलीकर जोडीला 'एक्झिट पोल'चा आधार!

Ashok Chavan and Prataprao Patil Chikhlikar : एक्झिट पोलच्या आधी वर्तवण्यात आलेल्या सर्व्हेने माजी मुख्यमंत्री व भाजपचे विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि नांदेडचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचे टेन्शन वाढवले होते.
Ashok Chavan-Pratap Patil Chikhalikar
Ashok Chavan-Pratap Patil ChikhalikarSarkarnama
Published on
Updated on

Nanded Loksabha Election Result : लोकसभेच्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी होतील, असा अदांज शनिवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. यापुर्वी याच मतदारसंघाबद्दल काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेमधून ही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण जिंकणार असल्याचा दावा केला गेला.

त्यामुळे आता नेमका एक्झिट पोलचा अंदाज खरा मानायचा की आधी केलेल्या सर्व्हेचा अहवाल? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. एक्झिट पोलच्या आधी वर्तवण्यात आलेल्या सर्व्हेने माजी मुख्यमंत्री व भाजपचे विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण(Ashok Chavan) आणि नांदेडचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचे टेन्शन वाढवले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यापुर्वी भाजपच्या अंतर्गत पाहणीमध्ये नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील एन्ट्रीनंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांनी पक्षात प्रवेश केला. महिनाभर हे प्रवेश सोहळे नांदेड जिल्ह्यात सुरू होते.

Ashok Chavan-Pratap Patil Chikhalikar
Bajrang Sonwane On Election Officer: मी स्वतःला संपवून घेईन! एक्झिट पोलनंतर सोनवणे निवडणूक अधिकाऱ्यांवर भडकले

चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांच्या ताकदीवर भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल, असा विश्वास भाजपच्या राज्य आणि केंद्र पातळीवरील नेत्यांना होता. निवडणुक प्रचारात अशोक चव्हाण यांनी भाजपच्या अब की बार चारसौ पार मध्ये नांदेडच्या प्रताप पाटील चिखलीकरांचा(Prataprao Patil Chikhlikar) नंबर सर्वात वरचा असेल, असे छातीठोकपणे सांगितले होते.

Ashok Chavan-Pratap Patil Chikhalikar
Jalna Lok Sabha Exit Poll : जालन्यात दानवेंचा विरोधकांना चकवा, विजयाचा षटकार ठोकणार?

7 मे रोजी प्रत्यक्षात नांदेड मतदारसंघासाठी मतदान पार पडले आणि त्यानंतर जी आकडेमोड महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी केली, त्यानंतर मात्र चव्हाण-चिखलीकर जोडीने विजयाबद्दल फारसे दावे केले नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र नांदेडची जागा आम्हीच जिंकणार असे सांगत नांदेडात(Nanded) आता वसंत चव्हाण चा दावा केला होता.

दरम्यान, काल लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपले आणि एक्झिट पोलचे अंदाज येऊन धडकले. यात नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे पुन्हा निवडून येत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर चव्हाण-चिखलीकर यांचा जीव काहीसा भांड्यात पडल्याचे चित्र आहे. अर्थात चार जूनच्या मतमोजणीनंतरच नांदेडच्या बाबतीत एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज एक्झॅक्ट ठरतो का? हे स्पष्ट होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com