Beed Lok Sabha Exit Poll: बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलताना "कांबळे साहेब हात आकडू नका, अन्यथा मी स्वतःला संपवून घेईन" असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. बीड जिल्ह्यातील स्ट्राँगरुमची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची महायुतीच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात थेट लढत झाली. तर काल समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार बीडचा निकाल मुंडे यांच्यासाठी दिसालादायक असून पोलमध्ये मतमोजणीत त्या आघाडीवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पोलची आकडेवारी सोनवणे यांच्यासाठी धक्का देणारी आहे. अशातच आता सोनवणे अॅक्टीव मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बीड लोकसभेची 4 जूनला पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोनवणे यांनी स्ट्राँगरुमला भेट दिली. यावेळी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांच्याशी बोलताना ते भडकले. शिवाय, कांबळेसाहेब हात आकडू नका, अन्यथा मी स्वतःला संपवून घेईन, असं खळबळजनक वक्तव्यदेखील सोनवणे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
4 जून रोजी बीडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. याच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर आज पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने या परिसराचा आढावा घेऊन पाहणी केली. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून 4 जून रोजी वाहतुकीतदेखील बदल केला आहे.
तसेच मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने 450 उपद्रवींना आयडेंटिफाय केले असून त्यातील सर्वच लोकांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्यावर पोलिसांची विशेष करडी नजर असल्याचंही पोलिस अधीक्षकंनी सांगितलं. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पॅरा मिलिटरी फोर्स, केंद्रीय पोलीस फोर्स, यासह SRPF जवान, पोलिस जवान मतमोजणी केंद्रासह जिल्ह्यात तैनात असणार आहेत. दरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.