

Congress-BJP News : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आॅपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाला होता, असा दावा करत सैन्याच्या पराक्रमावर सवाल उपस्थित केला. याआधीही काँग्रेसने पाक व्याप्त काश्मिर का घेतले नाही? युध्द कोणाच्या दबावामुळे थांबवले? मोदी ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकले म्हणत टीका केली होती.
आता अमेरिकेतील एका उद्योजकाच्या मानव तस्करी व देह व्यापाराच्या प्रकरणात भाजपचे माजी खासदार अडकले आहेत. त्याची कागदपत्रं 19 डिसेंबर रोजी अमेरिकत जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतर भारताच्या राजकारणात भूकंप होऊन महाराष्ट्रातील एक मराठी व्यक्ती पंतप्रधान होणार आहे, असे दावे पृथ्वीराज चव्हाणांकडून (Prithviraj Chavan) केले जात आहे. सातत्याने भाजपवर तोफ डागणाऱ्या पृथ्वीराजबाबांच्या विरोधात आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण मैदानात उतरले आहेत.
काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांना भारतीय सैन्याच्या पराक्रमावर विश्वास नाही, त्यांना पाकिस्तानी सैन्यावर विश्वास असल्याचा टोला लगावताना अशोक चव्हाण यांनी आॅपरेशन सिंदूर दरम्यानच्या सैन्याचा पराक्रमच आपल्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमधून मांडला. पृथ्वीराज चव्हाण यांना सडेतोड उत्तर देताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला झालेल्या नुकसानीचा तपशील सांगितला होता.
त्याचाच हवाला देत पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे. पाकिस्तानी सैन्याचे एकूण चार ठिकाणचे रडार नष्ट करण्यात आले होते. कमांड आणि कंट्रोलचे दोन सेंटर्स नष्ट करत पाकिस्तानला दणका देण्यात आला.
2 हवाई तळांवरील धावपट्ट्या उध्वस्त केल्या गेल्या. तीन वेगवेगळ्या स्टेशन्सवर 3 हॅन्गर्सचे नुकसान झाले. पाकिस्तानचे एक C-130 क्लासचे विमान, 4-5 लढाऊ विमाने, F-16 विमानांचे नुकसान, एक लांब पल्ल्याचे विमान (AEW&C किंवा SIGINT) 300 किमी पलीकडील हल्ल्यात नष्ट, तर 5 अत्याधुनिक लढाऊ विमाने (F-16 किंवा JF-17 क्लास) नष्ट करण्यात आली.
या शिवाय हवाई संरक्षण प्रणाली 1 सरफेस टू एअर मिसाईल (SAM) प्रणाली नष्ट करण्यात आल्याचे अशोक चव्हाण यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. भारतीय सैन्याच्या पराक्रमावर काँग्रेसला विश्वास नाही. त्यांना पाकिस्तानच्या सैन्यावर अधिक विश्वास आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.