Ashok Chavan : अशोक चव्हाण, डी. पी. सावंत, राजूरकरांच्या घराबाहेर शुकशुकाट

Political News कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी आणि गाड्यांची वर्दळ असलेल्या अशोक चव्हाणांच्या आनंद नीलयम या बंगल्याबाहेर शांतता
Nanded Ashok Chavan Home
Nanded Ashok Chavan HomeSarkarnama
Published on
Updated on

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील अनेक माजी आमदार, काँग्रेसचे पदाधिकारी अशोक चव्हाण यांच्या निर्णयावर बोलायला तयार नाहीत. अशोक चव्हाण यांच्या बंगल्याशेजारीच राहणारे माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार अमर राजूरकर यांच्या घराबाहेरही शुकशुकाट पसरला आहे. एरवी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी आणि गाड्यांची वर्दळ असलेले अशोक चव्हाण यांच्या आनंद नीलयम या बंगल्यातही शुकशुकाट होता.

अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर आलेली असताना महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असणार आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन आमदारांसह मराठवाड्यातील इतर काँग्रेस आमदारांच्या भूमिकेकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Nanded Ashok Chavan Home
Ashok Chavan : 82 वर्षांच्या सुशीलकुमार शिंदेंचा अशोक चव्हाणांना इशारा; म्हणाले, 'जे राहिले ते लढले अन्...'

गेल्या दीड वर्षापासून अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात जाणार याची चर्चा केली जात होती. या चर्चा अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी फेटाळूनही लावल्या होत्या, पण आज अचानक अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवून दिला. तत्पूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. याची माहिती नांदेड शहरात पसरली आणि एकच खळबळ उडाली.

Nanded Ashok Chavan Home
Raosaheb Danve Watched The Kerala Story: चारशे महिलांसोबत दानवेंनी पाहिला `द केरळा स्टोरी`, सेल्फीही दिल्या..

नांदेड जिल्ह्यात आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मोहन अण्णा हंबर्डे, जितेश अंतापूरकर व अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे चार आमदार आहेत. काँग्रेस पक्षाचा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर या तीन आमदारांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

R

Nanded Ashok Chavan Home
Ashok Chavan Resignation : विजय वडेट्टीवारांनी दिले भविष्याचे संकेत म्हणाले...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com