Ashok Chavan On PM Modi News : अशोक चव्हाण म्हणतात, मोदींच्या वचनबद्धतेमुळे मेट्रो नेटवर्क क्षेत्रात क्रांती!

Ashok Chavan says, Modi will bring about a metro rail revolution in the country-BJP-Prime Minister-India-Maharashtra : ज्या वेगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मेट्रो रेल्वेचे जाळे वाढत आहे, ते पाहता लवकरच आपण मेट्रो रेल्वेच्या क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरू.
Ashok Chavan -PM Modi News
Ashok Chavan -PM Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अक्षरशः फॅन झाले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली देशात होणाऱ्या प्रगतीची अनेक उदाहरणे देत अशोक चव्हाण सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.

काँग्रेसमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कारभारावर टीका, देशात मोदींची नाही, तर काँग्रेसची गॅरंटी चालते असे म्हणणाऱ्या अशोक चव्हाण यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वचनबद्धता, गतीशीलता आणि सबका साथ सबका विकास या धोरणाचे कौतुक होत आहे. मेट्रोचे जाळे विस्तारण्यात भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

Ashok Chavan -PM Modi News
BJP strategy 2025 : भाजप ‘आप’चा खेळ बिघडवण्याठी सज्ज, देशाची राजधानी जिंकण्याची रणनीती आज ठरणार

परंतु ज्या वेगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मेट्रो रेल्वेचे जाळे वाढत आहे, ते पाहता लवकरच आपण मेट्रो रेल्वेच्या क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरू, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी आपल्या 'एक्स'वरील प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत शहरी गतिशीलता क्रांतीचा अनुभव घेत आहे.

Ashok Chavan -PM Modi News
PM Narendra Modi Gift : मोदींनी बायडेन यांच्या पत्नीला दिलेला हिरा ठरला सर्वात महागडे गिफ्ट; किती आहे किंमत? ही आहेत खास वैशिष्ट्ये...

देशभरातील मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विस्तार लाखो लोकांसाठी शहरी प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक प्रवेशयोग्य बनवत आहे, पायाभूत सुविधांच्या विकासातील अतुलनीय प्रगतीचे दशक दर्शवित आहे. 2014 मध्ये, पाच शहरांमध्ये केवळ 248 किमी मेट्रो रेल्वे सुरू होत्या. आज, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईसह 28 शहरांमध्ये अतिरिक्त 998 किमी बांधकामासहित 23 शहरांमध्ये 1,000 किमीच्या पुढे हा टप्पा गेला आहे. 2014 मधील 28 लाख वरून रोजची प्रवासी संख्या आज 1 कोटींहून अधिक झाली आहे.

Ashok Chavan -PM Modi News
Ashok Chavan On Patole News : अशोक चव्हाण म्हणतात, नाना पटोलेंची लायकी साकोलीच्या जनतेने दाखवून दिली!

2022 मध्ये जपानला मागे टाकून केवळ चीन आणि यूएसए नंतर भारत आता कार्यरत मेट्रो नेटवर्क लांबीमध्ये जागतिक स्तरावर तिसरा क्रमांकावर आहे. 2014 पूर्वी 600 मीटर प्रति महिना ते आज 6 किमी प्रति महिना मेट्रो बांधकामाचा वेग वाढल्याने, ही क्रांती पंतप्रधान मोदींच्या परिवर्तनाची वचनबद्धता शहरी गतिशीलता दर्शवते, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com