PM Narendra Modi Gift : मोदींनी बायडेन यांच्या पत्नीला दिलेला हिरा ठरला सर्वात महागडे गिफ्ट; किती आहे किंमत? ही आहेत खास वैशिष्ट्ये...

Jill Biden Joe Biden Diamond Gift : जिल बायडेन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले गिफ्ट त्यांना स्वत:कडे ठेवता येणार नाही.
Narendra Modi with Joe Biden and Jill Biden
Narendra Modi with Joe Biden and Jill BidenSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणजेच राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल यांना एक हिरा गिफ्ट दिला होता. हा हिरा 2023 मधील सर्वात महागडे गिफ्ट ठरले आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. हा हिरा 7.5 कॅरेटचा असून त्याची किंमत जवळपास 17 लाख एवढी आहे.

पंतप्रधान मोदी जून 2023 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी जिल बाडडेन यांना हा हिरा भेट दिला होता. अमेरिकेतील विदेश मंत्रालयाकडून दरवर्षी एक अहवाल प्रसिध्द केला जातो. त्यामध्ये विदेशातील नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंचा संपूर्ण लेखाजोखा असतो. नेत्यांकडून एकमेकांना आठवण म्हणून काही ना काही भेट दिली जाते. 2023 मधील याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार हा हिरा या वर्षातील सर्वात महागडे गिफ्ट ठरला आहे.

Narendra Modi with Joe Biden and Jill Biden
PM Narendra Modi : मीही शीशमहल बनवू शकलो असतो! 'या' मुद्द्यावर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बोलले...

मोदींनी दिलेल्या हिऱ्याचे वैशिष्ट्ये

पंतप्रधान मोदींनी जिल यांना दिलेला हिरा इको फ्रेंडली आहे. तो बनविण्यासाठी सौर ऊर्जा आणि हवेपासून तयार करण्यात आलेल्या ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. हिरा बनवताना प्रति कॅरेट केवळ 0.028 ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते. या हिऱ्याला इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटमधील जेमोलॉजिकल लॅबचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्र सरकारने लॅबमध्ये हिऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले होते. या हिऱ्यांवरील 5 टक्के कस्टम ड्युटी हटवण्यात आली होती. तसेच सरकारने आयआयटी मद्रासला पाच वर्षे लॅबमध्ये हिरा बनविण्याबाबत संशोधनासाठी अनुदान देण्याची घोषणाही केली होती. अशाच एका लॅबमध्ये तयार करण्यात आलेला हिरा मोदींनी गिफ्ट दिला होता.

Narendra Modi with Joe Biden and Jill Biden
Delhi Politics : सावरकरांवरून वाद पेटला; दिल्लीशी त्यांचा काय संबंध? काँग्रेसचा संताप

जिल यांना मिळणार नाही हिरा

अमेरिकेचे राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळालेले गिफ्ट ते स्वत:कडेच ठेवतात. पण महागडी गिफ्ट अमेरिकेच्या नॅशनल अर्काइव्हमध्ये ठेवली जातात. किंवा व्हाइट हाऊसमध्ये ठेवली जातात. द गार्डियनच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी दिलेला हिरा व्हाइट हाऊसमधील ईस्ट विंगमध्ये सर्वांना पाहण्यासाठी ठेवला जाणार आहे. इतर गिफ्ट अर्काइव्हमध्ये पाठवली जाणार आहेत. त्यामुळे जिल बायडेन यांना मोदींनी गिफ्ट दिलेला हिरा मिळणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com