Ashok Patil Nilangekar : धोंडे जेवण कार्यक्रमात अशोक पाटलांनी जाहीर केली आमदार होण्याची इच्छा..

Latur Politics : आता आमदारकीसाठी आपण शेवटची संधी म्हणून जनतेत जाणार आहोत.
Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur
Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, LaturSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राजकारणात जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, बाजार समिती, जिल्हा बॅंकेत संधी मिळाली. पण एकदा विधानसभेत जाण्याची संधी द्या. (Ashok Patil Nilangekar) संभाजी पाटील निलंगेकरांना अनेकदा संधी दिली, एकदा मला द्या, मग पहा, अशा शब्दात काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.

Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur
High Court News : कासारसिरसी अप्पर तहसिल कार्यालयचा वाद पोहचला न्यायालयात...

धोंडे जेवण आणि काॅंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विधासभेत संधी मिळावी म्हणून जनतेमध्ये जाणार असल्याचेही निलंगेकर म्हणाले. (Latur) औरादशहाजानी येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम आणि विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली माहेश्वरी भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. (Marathwada) आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये पंचायत समिती निवडणूक लढवून सभापती झालो, जिल्हापरिषदेचा अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँकेचा अध्यक्ष, बाजार समिती सभापती यासह शासनाच्या विविध कमेटीवर काम केले.

विधानसभा निवडणूकही दोनवेळा लढवली मात्र पराभव झाला. आता शेवटची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे अशोक पाटील यांनी उपस्थितांना सांगितले. यापूर्वी संभाजी पाटील निलंगेकर यांना निवडून दिले आहे. त्यांच्या कामाची पध्दत आपण पाहिली आहे. आता मलाही एकवेळ आमदार म्हणून संधी देवून माझ्या कामाची पध्दत पहा, असे आवाहनही त्यांनी केले. आता आमदारकीसाठी आपण शेवटची संधी म्हणून जनतेत जाणार आहोत, असेही पाटील यांनी जाहीर केले. लातूर जिल्ह्याच्या राजकारणात अशोक पाटील व संभाजी पाटील या काका-पुतण्याचे राजकारण सर्वश्रुत आहे. संधी मिळेल तेव्हा दोघेही एकमेकांवर टीका करतात.

अशोक पाटील काॅंग्रेसमधून तर पुतणे संभाजी पाटील भाजप पक्षातून आपले राजकारण करतात. काॅंग्रेसने अशोक पाटील निलंगेकर यांना दोनवेळा विधानसभेची उमेदवारी दिली, पण त्यांच्या पदरी निराशाच आली. आमदार होण्याची त्यांची इच्छा अपुर्ण असल्यामुळे काहीसे भावनिक होत त्यांनी धोंडे जेवण व मेळाव्यात उपस्थिती काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली. एवढेच नाही तर आपल्यासाठी ही शेवटीची संधी असेल, पुन्हा पराभव नशिबी आला तर निवडणूक लढवणार नाही, असेही अशोक पाटील यांनी जाहीर केले. निलंगेकर यांच्या या भूमिकेची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com