Nilanga Assembly Constituency 2024 : काँग्रेसचे निलंगेकर बंडाचा झेंडा हाती घेणार ? पत्नीने घेतली जरांगे पाटलांची भेट

Congress News: अनेक पक्षात राहून काँग्रेसमध्ये आलेल्या उपऱ्यांना काँग्रेस पक्षाने संधी दिल्याचा आरोप करत निष्ठावंत निलंगेकर समर्थकांनी बंडाची तयारी सुरु केली आहे. जर अशोक पाटील नंगेगेकर यांनी बंडाचे निशान फडकवले तर याचा फटका काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला बसू शकतो.
Nilanga Assembly Constituency News
Nilanga Assembly Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या निलंगा मतदारसंघात दोन वेळा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने यावेळी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांचा पत्ता कट करत माजी अमित देशमुख समर्थक अभय सोळुंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलंगेकरांचे तिकीट कापल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या `अशोक` बंगल्यावर घोषणाबाजी करत बंड पुकारा, अशी साद घातली आहे.

यावर अशोक पाटील निलंगेकर हे उद्या (ता.28) रोजी निर्णय घेणार आहेत. (Congress) दुसरीकडे अशोक पाटील यांच्या पत्नी संगीता निलंगेकर यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. निलंगा तालुक्यातील काँग्रेसमध्ये असलेले निलंगेकरांचे वर्चस्व संपवण्यासाठी अमित देशमुख यांनीच त्यांचा पत्ता कट केल्याचा आरोप निलंगेकर समर्थकांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या अशोक पाटील निलंगेकर काय निर्णय घेतात? बंडाचा झेंडा फडकवतात का? यावर निलंग्यातील चित्र ठरणार आहे. अशोक पाटील निलंगेकर यांनी आज कार्यकर्त्याची बैठक घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले. बहुतांश कार्यकर्त्यांनी आपण निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांच्याकडे धरला. यावर आज कुठलाही निर्णय घेण्यात आला नसला तरी उद्या, सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करू, असे सांगत निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांना थोपवून धरले आहे.

Nilanga Assembly Constituency News
Congress Third list of candidates : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; जाणून घ्या, किती उमेदवारांना दिली संधी?

काँग्रेसने निलंगा विधानसभा मतदारसंघातून अभय सोळुंके यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे अशोक पाटील निलंगेकर हे नाराज आहेत. 62 वर्षांपूर्वीची निलंगेकर घराण्याची परंपरा या निमित्ताने खंडित झाली आहे. (Latur) निलंगेकर समर्थक हजारो कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी येथील फार्मसी कॉलेज वर मतदार संघातील निष्ठावंत निलंगेकर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी व जिल्ह्याचे नेतृत्व करणारे अमित देशमुख यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

अनेक पक्षात राहून काँग्रेसमध्ये आलेल्या उपऱ्यांना काँग्रेस पक्षाने संधी दिल्याचा आरोप करत निष्ठावंत निलंगेकर समर्थकांनी बंडाची तयारी सुरु केली आहे. जर अशोक पाटील नंगेगेकर यांनी बंडाचे निशान फडकवले तर याचा फटका काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला बसू शकतो. नेमकं बंडखोरी करायची? का पक्षातच राहायचे, याबाबतचा निर्णय अशोक पाटील उद्या घेणार आहेत.

Nilanga Assembly Constituency News
Nilanga Assembly Constituency 2024 : काँग्रेसने भाकरी फिरवली, निलंगेकरांचा पत्ता कट! देशमुख समर्थकाला उमेदवारी

बंडखोरीचा निर्णय झाला तर ते उद्या, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे त्यांच्या पत्नी संगीता अशोक पाटील निलंगेकर यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत येऊन भेट घेतली. त्यामुळे अशोक पाटील निलंगेकर हे बंडखोरी करून जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळवतात का? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com