Nilanga Assembly Constituency 2024 : काँग्रेसने भाकरी फिरवली, निलंगेकरांचा पत्ता कट! देशमुख समर्थकाला उमेदवारी

Congress rejected the candidature of Ashok Patil Nilangekar :निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस म्हणजेच निलंगेकर आणि निलंगेकर म्हणजेच काँग्रेस असे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून चालत आले आहे. पण हे समीकरण यंदा अमित देशमुख यांनी मोडीत काढले.
Ashok Patil Nilangekar
Ashok Patil NilangekarSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

Maharashtra Assembly Election 2024 : निलंगा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर माजी मंत्री अमित देशमुख यांचे कट्टर समर्थक अभय सोळुंके यांना देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांचा पत्ता कट करण्यात आला असून निलंग्यातील 62 वर्षांची निलंगेकर घराण्यात उमेदवारीची परंपरा या निमित्ताने खंडीत झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात होऊ लागली आहे. काँग्रेसने उमेदवार बदलल्यामुळे काका-पुतण्यांमधील पारंपारिक लढत देखील यावेळी होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने (Congress) भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात नवा चेहरा मैदानात उतरवला आहे. अनुभवी विरुद्ध नवखा असा हा थेट सामना होणार असला तरी अभय सोळुंके यांच्यासाठी अमित देशमुख पुर्ण ताकद लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोळुंके यांच्या उमेदवारीने भाजपला निवडणुक एकतर्फी वाटत असली तरी लोकसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार डाॅ. शिवाजी काळगे यांना मिळालेले मताधिक्य बरेच बोलके आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस म्हणजेच निलंगेकर आणि निलंगेकर म्हणजेच काँग्रेस असे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून चालत आले आहे. पण हे समीकरण यंदा अमित देशमुख यांनी मोडीत काढले. अशोक पाटील यांची उमेदवारी कापल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये रोष आहे. आता निवडणुकीत याचा काँग्रेसला फटका बसतो? की मग केलेला बदल यशस्वी होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

Ashok Patil Nilangekar
Congress Second candidate list : अखेर काँग्रेसचं ठरलं! दुसऱ्या यादीत 'या' उमेदवारांना संधी

निलंगा विधानसभा मतदार संघ नेहमीच चर्चेचा मतदार संघ राहीला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा गांधी घराण्याचे विश्वासू माजी मुख्यमंत्री दिवंगत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा हा मतदार संघ. पाच दशक त्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले. (Latur) राज्यात जवळपास तीस वर्ष मंत्री म्हणून काम करण्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना याच मतदारसंघाने मिळवून दिला. काँग्रेसला शंभर वर्ष झाले होते त्यावेळी दिवंगत शिवाजीराव पाटिल निलंगेकर राज्यात प्रदेशाध्यक्ष होते.

महाराष्ट्रात अनेकांना तिकिट वाटप करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असयाचे. परंतु आज त्याच्याच वारसाची उमेदवारी कापण्यात आली. दोन टर्मपासून अशोकराव पाटील निलंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु सलग दोन वेळा पराभूत झाल्यानंतर पक्षाने अशोक पाटील यांना बदलण्याचा निर्णय घेतला. या मागे गढीवरच्या देशमुखांचा मोठा हात असल्याचे बोलले जाते.

Ashok Patil Nilangekar
Latur Assembly Constituency 2024 : भाजपच्या पहिल्या यादीतून `लातूर शहर`,`ग्रामीण`ला का वगळले ?

लोकसभा निवडणुकीत अमित देशमुख यांनी शंभर टक्के रिझल्ट दिल्यामुळे राज्य पातळीवर त्यांच्या शब्दला वजन आले आहे. यातूनच अशोक पाटील निलंगेकर यांचा पत्ता यावेळी कट झाल्याची चर्चा आहे. निलंगेकर घराण्याची मागील 62 वर्षापासूनची काँग्रेसच्या उमेदवारीची परंपरा या निमित्ताने खंडित झाली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर हजारो कार्यकर्ते `अशोक` बंगल्यावर दखल झाले. अनेकांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली, तर काहींनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

मी काँग्रेसला सोडलं नाही, मला काँग्रेसने सोडले..

दरम्यान आशोकराव पाटील निलंगेकर यांनी उद्या सकाळी दहा वाजता फार्मसी कॉलेज निलंगा येथे मतदारसंघातील कार्यकर्त्याची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सोशल मीडिया वरती त्यांनी व्हिडिओ प्रसारित करत नाराजी व्यक्त केली आहे. मी काँग्रेसला सोडले नाही तर मला काँग्रेसने सोडले. निष्ठावंत घराण्याला डावलले आहे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2019 मध्ये निवडणुकीत मला 65 हजार मतदान पडले होते, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. आता ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com