Ashok Waghmare: अजित पवारांच्या बनावट लेटरपॅडद्वारे विकास कामं मंजूर करण्याचा प्रयत्न करणारा मास्टरमाइंड सापडला; कोण आहे हा व्यक्ती?

Ashok Waghmare: जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल एक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

बीड : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बनावट लेटरपॅडवर खोटी स्वाक्षरी करून जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल एक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Ajit Pawar
Top 10 News: धक्क्यावर धक्के सहन केलेल्या काँग्रेससाठी मोठी दिलासादायक बातमी ते रोहित आर्याचं पुणे कनेक्शन, माणूस नेमका कसा होता?

वाघमारे याने अजित पवार यांच्या नावाने तयार केलेले हे बनावट पत्र जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांना दिले. त्यानंतर काही दिवसांनी वाघमारे थेट मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचला आणि 'पत्रावर अजून कार्यवाही झाली नाही,' अशी तक्रार केली. त्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांना संशय आला. तपासात हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर वाघमारेवर बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Ajit Pawar
Rohit Aarya: रोहित आर्याचं पुणे कनेक्शन, माणूस नेमका कसा होता? शेजाऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून चक्रावून जाल

या पत्रामध्ये लहामेवाडी गावातील विविध विभागांत प्रत्येकी दहा लाख रुपयांची एकूण दहा कामांचा समावेश आहे. जसे की एलईडी पथदिवे, पेव्हर ब्लॉक आदी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर करावीत, अशी मागणी करण्यात आली होती.

Ajit Pawar
Sangli News: सुधीर गाडगीळांच्या 'लेटर बॉम्बला' चंद्रकांतदादांनी भेटूनच दिलं उत्तर; एकाच वाक्यात केलं शांत!

संशयित थेट उपमुख्यमंत्री कार्यालयात

या प्रकारामागे वाघमारे एकटाच नसून त्यालाही कोणीतरी ठगवले असावे, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. जर स्वतः वाघमारेनेच हे बनावट पत्र तयार केले असते, तर तो केवळ जिल्हा नियोजन समितीपुरताच विषय ठेवला असता. मात्र, त्याने थेट उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबई कार्यालयात भेट दिल्याने त्याला एखाद्या व्यक्तीने 'पालकमंत्र्यांकडून कामे मंजूर करून देतो' असे सांगून फसवले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. वाघमारे हे निवृत्त शिक्षक असून त्यांची पत्नी लहामेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत.

गावात विकासकामे करून त्यातून काही निधी मिळविण्याच्या आशेने हा प्रकार घडल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात कोणत्या मास्टरमाइंडने वाघमारेचा वापर करून बनावट लेटरपॅड तयार केले, हे तपासातून समोर येणार आहे. कारण यापूर्वीही अशाच प्रकारे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बनावट लेटरपॅड, खोटी स्वाक्षरी आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचा आवाज वापरून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा प्रयत्न झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com